शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

आधुनिक बस प्रवाशांसाठी ' बिनकामाच्या '

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:12 PM

'पीएमपी' च्या ताफ्यात काही वर्षांपर्यंत स्वयंचलित दरवाजे तसेच इतर आधुनिक सोयीसुविधा नसलेल्या बस होत्या...

ठळक मुद्देस्वयंचलित दरवाजे, डिजिटल फलक बंदकोट्यवधींचा खर्च पाण्यात चालला असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त अनेक बसवर जुने पत्र्याचे पारंपरिक फलकच

पुणे : प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने ताफ्यात आलेल्या बस प्रवाशांसाठी बिनकामाच्या ठरत आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या ताफ्यातील अनेक बसचे स्वयंचलित दरवाजे, डिजिटल फलक, उदघोषणा करणारी यंत्रणा, सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे या सुविधांचा प्रवाशांना काहीच फायदा होत नाही. परिणामी कोट्यवधींचा खर्च पाण्यात चालला असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.' पीएमपी' च्या ताफ्यात काही वर्षांपर्यंत स्वयंचलित दरवाजे तसेच इतर आधुनिक सोयीसुविधा नसलेल्या बस होत्या. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजने (जेएनएनयुआरएम)अंतर्गत २००९ मध्ये पीएमपीच्या ताफ्यात पहिल्यांदा आधुनिक बस दाखल झाल्या. त्यानंतर २०१२-१३ मध्ये भाडेतत्वारही अशाचप्रकारच्या बस घेण्यात आल्या. पुढील पाच वर्ष बसखरेदी झाली नाही. २०१८ मध्ये मिडी बसच्या माध्यमातून प्रवाशांना नवीन आधुनिक बस मिळाल्या. तेव्हापासून ही प्रक्रिया वेगाने होत असून आतापर्यंत ई-बससह ४०० हून अधिक आधुनिक बस प्रवाशांच्या सेवेसाठी आल्या आहेत. या सर्व बसमध्ये स्वयंचलित दरवाजे, बसच्या पुढील व मागील बाजूस डिजिटल फलक, अनेक बसमध्ये उदघोषणा यंत्रणा, सीसीटीव्ही, आरामदायी आसने अशा सोयी-सुविधा आहेत. त्यासाठी पुणेकरांनी कररुपाने दिलेले कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण या सोयीसुविधांपासून प्रवाशांनाच वंचित राहावे लागत असल्याची स्थिती आहे.सद्यस्थितीत अनेक बसचे स्वयंचलित दरवाजे बंद आहेत. हे दरवाजे दोरीने बांधलेले किंवा दगड लावून अडविलेले दिसतात. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी हे दरवाजे सुरू करण्याची मागणी सातत्याने प्रवासी संघटनेकडून केली जाते. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. डिजिटल फलकाकडेही पीएमपी प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. अनेक बसवर जुने पत्र्याचे पारंपरिक फलकच झळकत आहेत. काही दिवसांपुर्वीच ताफ्यात आलेल्या नवीन सीएनजी व ई-बसच्या लोकार्पणादिवशीच हे चित्र पाहायला मिळाले. काही बसमध्ये थांब्याची सुचना देणारी उदघोषणा यंत्रणा आहे. तर काही बसमध्ये सीसीटीव्हीही आहेत. पण या दोन्ही यंत्रणा बंद आहे. सीसीटीव्ही सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी हे सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाशी जोडले गेले नाहीत, तसेच त्यामध्ये रेकॉर्ड झालेले चित्रणही वेळोवेळी पाहिले जात नसल्याची कबुली अधिकाºयांकडून दिली जाते. ----------------------गुणवत्ता पथक असावेपीएमपीचे तत्कालीन प्रभारी अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी गुणपत्ता पथकाची कल्पना मांडली होती. त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक बसची चेकलिस्ट तयार करून त्यानुसार बसची देखभाल-दुरूस्ती करता येईल. पायाभुत सुविधांचा प्रवाशांना अधिकाधिक फायदा होईल, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. - संजय शितोळे, सचिव, पीएमपी प्रवासी मंच

........

स्टॉप बटनबाबत अनभिज्ञनवीन बसमध्ये स्टॉप बटण् आहेत. बसमधील उभ्या बारला ही बटन लावलेली आहेत. पण त्याबाबत प्रवाशांसह चालकही अनभिज्ञ आहेत. बसमध्ये गर्दी असल्यास प्रवाशांना या बटणचा वापर करून बस थांबविता येऊ शकते. त्याचा वापर अजिबात केला जात नाही. गदीर्तून वाट काढत, चालक-वाहकांना आवाज देत प्रवासी थेट दरवाजाजवळ जाऊन थांबतात..................... तर चालकांवर कारवाईअनेक बसचे स्वयंचलित दरवाजे बंद केले जात नसल्याचे पीएमपी प्रशासनाच्याही निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने बसचे दरवाजे बंद ठेवण्याच्या सुचना सर्व चालकांना दिल्या आहेत. दरवाजा बंद होण्यात काही अडचणी असल्यास त्याबाबत संबंधितांना कळवून ते दुरूस्त करून घ्यावेत. प्रवासादरम्यान दरवाजे उघडे असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित चालकावर कारवाई करण्याचा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला आहे.-------------

चालक अप्रशिक्षितबसमध्ये आधुनिक सोयीसुविधांबाबत चालकांना पुरेशी माहिती असत नाही. डिजिटल फलक सुरू करणे, त्यात बदल करणे, आयटीएमएस यंत्रणा, स्वयंचलित दरवाजाची उघडझाप करताना घ्यावयाची काळजी, त्याची तांत्रिक माहिती याबाबत चालकांना पुरेसे प्रशिक्षण दिले गेलेले नाही. त्यामुळे या सुविधांचा वापर अनेकदा होत नसल्याचे एका चालकाने 'लोकमत' शी बोलताना सांगितले.- 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे