पुणे : दैनंदिन नियोजनापेक्षा १५० ते २०० बस मार्गावर कमी येणे, चार हजारांहून अधिक फेऱ्या रद्द होत असल्याने तासन्तास बसथांब्यावर ताटकळत उभ्या राहणाऱ्या आणि बसमधील गर्दीचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना सोमवारी (दि.१०) सुखद धक्का मिळणार आहे. यादिवशी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मार्गावर १७०० बस सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘पीएमपी’कडून दररोज सुमारे १६८५ ते १७०० बस मार्गावर सोडण्याचे नियोजन केले जाते. या नियोजनानुसार दररोज बसच्या २१ हजार ते २२ हजार फेऱ्या होणे अपेक्षित असते. पण प्रत्यक्षात दररोज नियोजन कोलमडत असल्याने अपेक्षित बस मार्गावर येत नाहीत. किमान १४५० ते १५५० बस मार्गावर येत असल्याने चार ते साडे चार हजार फेºया रद्द कराव्या लागतात. परिणामी, प्रवाशांना बसथांब्यांवर बराच वेळ थांबावे लागत आहे. अनेकदा बसमधून गर्दीतून जाण्याची वेळ येते. पीएमपीच्या ताफ्यात आता ६०० हून अधिक नवीन बस दाखल झाल्या आहेत. तसेच भाडेतत्त्वावरील सुमारे १२५ ई-बस ताफ्यात आल्या आहेत. पण त्यानंतरही मार्गावरली बससंख्या अपेक्षित वाढली नव्हती. चालक व वाहकांअभावी तसेच दुरुस्तीच्या कारणास्तव अनेक बस आगारातच उभ्या राहत होत्या. तसेच कर्मचाºयांचे गैरहजेरीचे प्रमाणही अधिक होते. आता कर्मचाºयांच्या गैरहजेरीवर नियंत्रण मिळविले जात आहेत. अधिकाधिक बस मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि. १०) जवळपास १७०० बस मार्गावर आणल्या जाणार आहेत. त्यासाठी चालक वाहकाच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून सर्व वाहक चालक प्रवासी सेवेत हजर राहणार आहेत. सर्व चालक वाहकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालयांसह सर्व आगारातील कंट्रोलर, चेकर, अधिकारी मार्गावर उतरून प्रवाशांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रवाशांना नियमित व अधिक चांगली बससेवा मिळावी, यासाठी हे नियोजन केले जात आहे. या माध्यमातून दोन कोटी रूपये उत्पन्नाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. त्यासाठी सर्व आगार स्तरावर नियोजन केले जात आहे. ........प्रत्येक सोमवारी अधिक बस‘पीएमपी’च्या बससेवेला प्रत्येक सोमवारी गर्दी असते. त्यामुळे या दिवशी अधिकाधिक बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना अधिक चांगली बस सुविधा मिळावी, यादृष्टीने प्रयत्न आहे. दि.१० फेब्रुवारीनंतर प्रत्येक सोमवारी १७०० बस सोडण्यासाठी प्रयत्न केले जातील. - अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी
‘पीएमपी’ची सोमवारी विक्रमी ‘धाव’; दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2020 12:18 PM
बसमधील गर्दीचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना सुखद धक्का मिळणार
ठळक मुद्दे१७०० बस मार्गावर आणणार : दररोज बसच्या २१ हजार ते २२ हजार फेऱ्या होणे अपेक्षित‘पीएमपी’च्या बससेवेला प्रत्येक सोमवारी गर्दी