शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; शिवसेना नेत्यांचा आग्रह मान्य?
2
Devendra Fadnavis Exclusive: "‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार!"
3
राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल
4
त्याग करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कुणासाठी? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
6
खेळीमेळीच्या वातावरणात हे सरकार स्थापन होत आहे : एकनाथ शिंदे
7
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
8
शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी नौदल अधिकाऱ्यांची नावे द्या; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
9
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
10
निकृष्ट दर्जाचे फूड आढळल्यास शिक्षणाधिकारी जबाबदार ; पालघरच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा लेखी फतवा
11
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
12
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
13
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
14
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
15
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
16
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
17
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
18
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
19
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
20
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे

पीएमपीची विमानतळ बससेवा ६ नव्हे एकाच मार्गावर; अपेक्षित उत्पन्न प्राप्त न झाल्याने ५ मार्गांवर बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 3:11 PM

लोहगाव विमानतळावरून ६ विविध मार्गांवर सुरु करण्यात आलेली एसी ई-बस अपेक्षित उत्पन्न आणि प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बंद करण्यात आली

उजमा शेख

पुणे: पीएमपीची अभी (एअरपोर्ट बस फॉर बिझनेस अँड हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटी) विमानतळ बस सेवा दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. ही बस सहा मार्गांवर सुरू होती. त्यासाठी नियमित दरात तिकीट आकारणी, तसेच सर्व थांबे असतानाही प्रशासनाला अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नसल्याने सहा मार्गांवरच्या बससेवा पीएमपी प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या आहेत.

लोहगाव विमानतळावरून ६ विविध मार्गांवर एसी ई-बसच्या माध्यमातून बससेवा सुरू करण्यात आली होती. अभी एअरपोर्ट बससेवेचे मार्ग हे बिझनेस व हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून तयार केला असल्याने या बससेवेसाठी आधी विशेष तिकीटदर आकारण्यात येत होते. हे दर जास्त असल्यामुळे प्रवाशांना ते परवडत नव्हते. ही बाब लक्षात येताच विमानतळ बससेवेची प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी तिकीट दरांमध्ये फेररचना करून नियमित बससेवेच्या दरात प्रवाशांना वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला; परंतु तरीही या मार्गावर अपेक्षित उत्पन्न आणि प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व ६ मार्गांवरील विमानतळ बससेवा बंद करण्यात आली आहे.

या मार्गावर विमानतळ बससेवा होत्या सुरू 

- लोहगाव विमानतळ ते हिंजवडी, माण फेज ३ शिवाजी चौक, पुणे विद्यापीठ गेट, मनपा भवन, पुणे स्टेशनमार्गे- विमानतळ ते भेकराईनगर (हडपसर) - हडपसर गाडीतळ, मगरपट्टा, खराडी बायपास चौक, हयात हॉटेल- विमानतळ ते निगडी - चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, लांडेवाडी कॉर्नर, भोसरी, मॅगझीन चौक, विश्रांतवाडी- विमानतळ ते स्वास्गेट - पूलगेट, वेस्ट एंड टॉकीज, पुणे स्टेशन, ब्ल्यू डायमंड हॉटेल, शास्त्रीनगर चौक- विमानतळ ते निगडी- चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, वाकडेवाडी, पुणे स्टेशन, शास्त्रीनगर रोड, हयात हॉटेल- विमानतळ ते कोथरूड स्टॅण्ड - गुडलक चौक, लोकमंगल, मनपा भवन, पुणे स्टेशन, ब्ल्यू डायमंड हॉटेल, गोल्फ क्लब 

नोव्हेंबर महिन्यातील उत्पन्न : १५९०५५प्रवासी संख्या - १४,०५०बस संख्या - २ (ई बस)फेरी - प्रत्येकी ४० मिनिटांनी

प्रवाशांसाठी नियमितच्या तिकीट दरात विमानतळ बससेवा ६ मार्गावर सुरू करण्यात आले होते; परंतु या सेवेमधून अपेक्षित उत्पन्न आणि प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या सहाही मार्गावरील बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. - सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpune airportपुणे विमानतळpassengerप्रवासीMONEYपैसाLohgaonलोहगावairplaneविमान