शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

पीएमपीचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 2:14 PM

निगडी ते कात्रज मार्गावरील पीएमपी बसचे बीअारटीचे दरवाजे उघडे हाेते, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धाेका निर्माण झाला हाेता.

पुणेपुणे शहराची एकमेव वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. मार्गावर ब्रेकडाऊनचे प्रमाण कायम असतानाच अाज निगडीवरुनकात्रजला जाणाऱ्या बसेसचे बीअारटीचे दरवाजे उघडे असल्याने प्रवाशांच्या जीवाला धाेका निर्माण झाला हाेता. या बसमध्ये माेठ्याप्रमाणावर गर्दी असल्याने एखाद्याचा धक्का लागून चालत्या बसमधून काेणी पडले असते तर एखाद्याला अापला जीव गमवावा लागला असता. त्यामुळे पीएमपी प्रशासन बसेसची देखभाल दुरुस्ती वेळेवर करणार का असा प्रश्न प्रवासी विचारत अाहेत. 

    निगडीवरुनकात्रजकडे जाणारी 42 क्रमांकाच्या एका बसचे बीअारटीच्या बाजूला असणारे दरवाजे उघडे हाेते. निगडी ते कात्रज हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या बसला गर्दी हाेती. बीअारटीचे दार उघडे असल्याने अनेक प्रवासी हे या दारांमध्ये उभे हाेते. काहीतर बाहेर डाेकावून सुद्धा पाहत हाेते. बस वेगात असताना एखाद्याचा धक्का लागून प्रवासी खाली पडला असता तर त्याचा जीव जाण्याची शक्यता हाेती.  बस अनेकदा वेगात असताना खड्यात अादळते. किंवा स्पीड ब्रेकरवरुनही बस जाताना माेठे हादरे बसत असतात अशात हे दरवाजे उघडे असल्याने अपघात घडण्याची शक्यता अधिक हाेती. या दरवाज्यांच्या बाजूला काही तरुणीसुद्धा उभ्या हाेत्या. या बसमधील प्रवाशांना अापला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत हाेता.  पीएमपी बसेसची अनेकदा देखभाल याेग्य प्रकारे केली जात नाही. त्यातही खासगी कंत्राटदार हे बसेसच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे बसेस मार्गावर बंद पडणे. बीअारटीचे दरवाजे काम न करणे अशा अनेक समस्या राेज निर्माण हाेत असतात. त्यामुळे प्रवाशांना माेठा मनस्ताप सहन करावा लागत असताे. त्यातच इतर शहरांच्या तुलनेत प्रवासी भाडे अधिक असल्याने अनेक नागरिक हे स्वतःच्या वाहनाचा उपयाेग करतात.

    पीएमपी प्रशासन एकीकडे नागरिकांना जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूकीचा वापर करण्याबाबत अावाहन करत असते. तर दुसरीकडे प्रवाशांना याेग्य त्या साेयीसुविधा देण्यास कमी पडत असल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर धाेकादायक वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर पाेलीस प्रशासन जशी कारवाई करत असते तशीच कारवाई पीएमपीवर करणार का असा सवालही अाता सर्वसामान्य विचारत अाहेत. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलkatrajकात्रजnigdiनिगडीNayana Gundeनयना गुंडे