पुणे : दिवाळीची सुट्टी संपल्याने बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये तत्पर बससेवा देण्याचे आदेश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी सर्व अधिकारी यांना दिले होते. सोमवारी (दि. २०) एकूण १६९८ बसेस संचलनात होत्या व जास्त उत्पन्नाच्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यातून परिवहन महामंडळाला एकाच दिवसात २ कोटी ६ लाख ३१ हजार ९४५ रुपयांचा विक्रमी उत्पन्न मिळाला. एकाच दिवसात तब्बल १२ लाख २३ हजा प्रवाशांनी प्रवास केला.
मजूर, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. त्याचबरोबर शहरातील शाळा व कॉलेज पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. दैनंदिन प्रवाशी संख्या व दैनंदिन उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेवर दाखविलेला विश्वास आहे. - नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल