पुणे :पुणे जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. पुणे जिल्ह्यात अनेक मोठे किल्ले आणि गड आहेत. इथल्या मातीत आणि रक्तातही छत्रपती शिवरायांचे विचार आणि त्यांची थोरवी दिसून येते. गेल्या काही दिवसांपूर्वी सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना पायथ्यापासून गडापर्यंत जाता यावे यासाठी पीएमपीची बस सेवा सुरू केली आहे. यावेळी बसच्या चालक बालाजी गुट्टे यांनी बस चालवत असताना महाराजांचा पोवाडा गायला. या पोवाड्यातून महाराजांच्या स्वराज्याची माहिती सांगण्याच्या प्रयत्न गुट्टे यांनी केला.
चालक गुट्टे यांचा पोवाडा पर्यटकांनाही चांगलाच भावला. पर्यटकांनी गुट्टे यांच्या पोवाड्याला साथ देत छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणाही दिल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी गुट्टे यांच्या पोवाड्याचे कौतुकही केले आहे.