पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या हस्ते रविवारी पीएमपीच्या चार नवीन बस मार्गांचे उद्घाटन झाले. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. सध्या नवीन चारही मार्गांवर प्रत्येकी एक बस धावणार असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गांवर बसेस वाढविल्या जातील.
१) मार्ग क्रमांक १७० - पुणे स्टेशन ते कोंढवा कौसरबाग या बससेवेचा मार्ग पुणे स्टेशन, पुलगेट, वानवडी, लुल्लानगर, दत्त मंदिर, कौसरबाग असा आहे.
२) मार्ग क्रमांक १७८ - स्वारगेट ते एस.आर.पी.एफ. कॅम्प वानवडी या बससेवेचा मार्ग स्वारगेट, पुलगेट, फातिमानगर, जगताप चौक, एस.आर.पी.एफ. कॅम्प वानवडी असा आहे.
३) मार्ग क्रमांक १८१ - न.ता.वाडी ते आझादनगर वानवडी या बससेवेचा मार्ग न.ता.वाडी, मनपा, अपोलो टॉकीज, नानापेठ, भवानीपेठ, पुलगेट, वानवडी कॉर्नर, जगताप चौक, साळुंके विहार, आझादनगर वानवडी असा आहे.
४) मार्ग क्रमांक २८९ - हडपसर ते सिध्दार्थनगर साळुंके विहार या बससेवेचा मार्ग हडपसर, फातिमानगर, जांभूळकर चौक, जगताप चौक, सिद्धार्थनगर साळुंके विहार असा आहे.