पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) कोथरूड डेपो येथून मुळशी तालुका परिसरात संचलनात असलेले १० बस मार्ग प्रवाशांच्या मागणीनुसार स्वारगेट/मार्केटयार्ड या ठिकाणाहून दिनांक १५ जून पासून पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत.
पूर्ववत सुरू करण्यात आलेले बसमार्ग खालीलप्रमाणे :--मार्ग क्रमांक पासून-पर्यंत मार्गाचा तपशील बस संख्या वारंवारिता
६९- मार्केटयार्ड ते घोटावडेगांव/मुगावडे - स्वारगेट, डेक्कन कॉर्नर, कोथरूड डेपो ०२ २ तास७०- मार्केटयार्ड ते मालेगांव (शेडाणी फाटा) - स्वारगेट, कोथरूड डेपो, पौडगांव, मालेगांव ०२ २ तास
२२७- मार्केटयार्ड ते उरावडेगांव (मारणेवाडी) - कोथरूड डेपो, भूगांव, उरावडेगांव ०१ ४ तास२२७ अ- मार्केटयार्ड ते खारावडे (लव्हार्डेगांव) - पिरंगुट, उरावडेगांव, मुठा ०३ १ तास१५ मि.
२३१- स्वारगेट ते काशिंगगांव कमान - डेक्कन कॉर्नर, पौडगांव, कोळवणगांव ०१ ४ तास२३२- स्वारगेट ते बेलावडे - कोथरूड डेपो, पौडगांव, कोंढावळे ०१ ३ तास ३० मि.
२३३- मार्केटयार्ड ते पौडगांव शासकीय वसतिगृह - स्वारगेट, भूगांव, घोटावडे फाटा ०७ ३० मि.२३३ अ- मार्केटयार्ड ते कोळवणगांव - स्वारगेट, कोथरूड, दारवली, डोंगरगांव ०३ १ तास
२३३ ब- स्वारगेट ते भादसगांव - स्वारगेट, कोथरूड, पौडगांव, रावडेवाडी ०१ ४ तास२७९- मार्केटयार्ड ते खांबोली (कातरखडक) - कोथरूड डेपो, पिरंगुट, रिहेफाटा, खांबोली ०१ ४ तास ३० मि.
उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या बससेवेचा लाभ प्रवाशी, नागरीक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग व शेतकरी यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.