पुणे : शहरात पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या बसला आग लागण्याच्या घटनांचे सत्र थांबायला काय तयार नाही. मंगळवारी दुपारी सीएनजी बसने संचेती रुग्णालयाजवळील पुलावर अचानक पेट घेतल्याने त्यात ती पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना संचेती रुग्णालयाजवळील पुलावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. विश्रांतवाडी ते कोथरूड या मार्गावरील बस दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथून निघाली. या बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. ही बस संचेती रुग्णालयाजवळील पुलावर आल्यानंतर पुढील बाजूने बसमधून अचानक धुर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आले. त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, चालकाने अग्निशमन दलाला याबाबत कळविले. अग्निशमन दलाची गाडी दाखल झाल्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोपर्यंत संपुर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीमुळे संपुर्ण बस जळून खाक झाली असून केवळ सांगाडा उरला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पीएमपी प्रशासनाने वर्तविला आहे.
पीएमपीची बस पुन्हा एकदा आगीच्या भक्ष्यस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 5:57 PM
विश्रांतवाडी ते कोथरूड या मार्गावरील बस दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथून निघाली. या बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते...
ठळक मुद्देचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलापीएमपी प्रशासनाचा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज