पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. बेकायदा बांधकाम थांबविण्याची नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकामवर आज कदमवाकवस्ती येथे कारवाई करण्यात आली आहे.
‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रात झालेल्या बेकायदा बांधकामांना यापूर्वीच नोटीस बजावल्या होत्या. या नोटीसमध्ये संबंधितांना बेकायदा बांधकाम थांबविण्याची सूचना करण्यात आली होती. तथापि या नोटीसला प्रतिसाद न देता काही व्यावसायिकांनी बांधकाम सुरूच ठेवल्याने ‘पीएमआरडीए’च्या नोटिशीला केराची टोपली दाखविणाऱ्या बांधकामवर आज प्रशासनाने कारवाई केली आहे. या संदर्भात ‘पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली आज कदमवाकवस्ती येथे कारवाई करण्यात आली आहे.
चौकट
हवेली तालुक्यात शेकडो अनधिकृत बांधकामे असून तेथे मात्र कारवाई नाही. ही कारवाई फक्त कदमवाकवस्तीमध्येच करण्यात आल्याने ही कारवाई काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून व सूडबुद्धीने करण्यात आली आहे, असे येथील नागरिकांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.