शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पीएमआरडीएचा सर्वकष वाहतूक आराखडा होणार सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 11:51 AM

पुढील ५० वर्षांचा विचार करून एल अ‍ॅण्ड टी कंपनीला सार्वजनिक सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम दिले होते.

ठळक मुद्देनवीन मेट्रो मार्ग : कार्यक्षेत्रातील ७७ लाख लोकांना मिळणार सुविधा सन २०३८ पर्यंत मेट्रोचे दोन टप्प्यातील मार्ग पूर्ण करण्याचे नियोजनत्तम सुविधा निर्माण करणे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पीएमआरडीए या तिन्ही संस्थांपुढे मोठे आव्हान

पुणे : पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या कार्यक्षेत्रातील सर्वकष वाहतूक आराखडाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रामुख्याने मेट्रोच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विविध मार्ग, रिंगरोड, या रिंगरोडवरील नगर रचना योजनेतील १४ टीपी स्कीम आणि या कायक्षेत्रातील जवळपास ७७ लाख लोकसंख्येसाठी पुढील ५० वर्षांचा विचार करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत बृहत आराखडा तयार करण्याचे काम एल अ‍ॅण्ड टी कंपनीला दिले होते. त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे, असे किरण गित्ते यांनी सांगितले.पीएमआरडीएच्या औंध येथील कार्यालयात येत्या मंगळवारी (दि. २७) रोजी दुपारी १२ वाजता हे सादरीकरण होणार आहे. गित्ते म्हणाले, पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, खराडी, उरूळी कांचन, रांजणगाव गणपती, सणसवाडी, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, पिरंगुट, तळेगाव दाभाडे, चाकण तसेच जेजुरी आदी विविध भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि आयटी पार्क उदयास आले आहे. या परिसराचा वेगाने विकास होत असून, औद्योगिक तसेच निवासी क्षेत्र याठिकाणी वाढले आहे. या कार्यक्षेत्रात जवळपास ७७ लाख ५० हजार लोक राहतात. त्यांना उत्तम सुविधा निर्माण करणे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पीएमआरडीए या तिन्ही संस्थांपुढे मोठे आव्हान आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करून एल अ‍ॅण्ड टी कंपनीला सार्वजनिक सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम दिले होते. सन २०३८ पर्यंत मेट्रोचे दोन टप्प्यातील मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जानेवारी २०१९ मध्ये पीएमआरडीच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. राज्याच्या महामेट्रो कंपनीच्या वतीने कात्रज ते निगडी आणि वारजे ते चंदननगर या मागार्चे काम सुरू झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील वाघोली ते हिंजवडी, चांदणी चौक ते हिंजवडी, खडकवासला ते पुणे कॅन्टोमेन्ट हद्द आणि हिंजवडी ते चाकण या मार्गांचे नियोजन पुढील काळात करण्यात येणार आहे, असे किरण गित्ते यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्तेMetroमेट्रो