पुणो : पुणो महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असून, हे प्राधिकरण केवळ नियोजानापूरेि न ठेवता त्याला एमएमआरडीएच्या धर्तीवर आर्थिक स्त्रोत निर्माण करण्यासाठी विविध पर्यायाचा विचार करण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र, मेट्रोविषयी दोन मतप्रवाह असल्याने त्याविषयी चर्चा करून समजून घेणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नागपूर येथील मेट्रोविषयी एकमत होते. परंतु, पुणो मेट्रोविषयी दोन प्रवाह आहेत. त्यामुळे मेट्रोविषयीची मते समजून घेवून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून रखडलेली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेच्या फे-या अडकणार असून, केंद्राच्या मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात असलेला प्रस्ताव पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन (डीएमआरसी)ने महापालिकेला 2क्क्7 मध्ये मेट्रोचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर महापालिकेने हरकती-सूचनांच्या सुनावणीसह मेट्रोचा प्रस्ताव मंजूर करून 2क्1क् मध्ये राज्य शासनाला सादर केला. त्यामध्ये वनाज ते रामवाडी या एकाच मार्गाचा समावेश प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर दोन्ही महापालिकांच्या हद्दीतून जाणा-या पिंपरी ते स्वारगेट या दुस-या मेट्रो मार्गासह प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला. राज्य शासनाकडून पुणो व नागपूर असे दोन्ही प्रस्ताव केंद्र शासनाकडे एकावेळी पाठविण्यात आले होते. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केवळ नागपूर मेट्रोचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पुणो मेट्रोच्या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, केंद्र शासनाने काढलेल्या त्रुटी दूर करून महापालिकेने आठवडय़ापूर्वी पुन्हा एकदा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. (प्रतिनिधी)
पीएमपीला स्वतंत्र अधिकारी देणार..
पुणो व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौन्सील हॉल येथे आज बैठक घेतली. त्यावेळी दोन्ही शहरातील खासदार, आमदार, नगर विकास खात्याचे सचिव, विभागीय आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ राव व आयुक्त कुणाल कुमार आदी उपस्थित होते. त्यावेळी पीएमपीला आठवडय़ाभरात स्वतंत्र आयएएस दर्जाचा अधिकारी देणार आहे. मुंबईप्रमाणो रेल्वे विभागाला सहभागी करून पुण्यातील वाहतुकीचे नियोजन करणार आहे. दोन्ही महापालिकेतून जाणा-या पीएमपीच्या वाहतुकीचा एकात्मिक मॉस्टर प्लॅन तयार करण्यास अधिका-यांना सांगितले आहे. कच-याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे.