पुणे : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मेट्रो प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली असली, तरी केंद्र शासनाकडे सादर केलेल्या मेट्रोच्या प्रस्तावात वारंवार त्रुटी दाखविल्या जात आहेत. त्यामुळे पीएमआरडीएची मेट्रो केंद्राच्या फेºयात अडकल्याचे दिसत आहे.पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यास राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरीही मिळाली आहे. पीएमआरडीए मेट्रो प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर राबविला जाणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी २० टक्के निधी तर उर्वरित ६० टक्के निधी खासगी उद्योजकांच्या सहभागातून उभा करण्यात येणार आहे. केंद्राकडून निधी मिळण्यासाठी पीएमआरडीएकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहेत. परंतु, त्यात पाच ते सहा वेळा त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. पीएमआरडीएकडून केंद्राकडून दाखविण्यात आलेल्या त्रुटींचे त्याचे वेळोवेळी समाधान करणारी उत्तरे पाठविण्यात आली. मात्र, चार ते पाच दिवसांपूर्वी केंद्राच्या समितीकडून पुन्हा एकदा त्रुटीचे पत्र पीएमआरडीएला प्राप्त झाले असून, त्याचेही उत्तर पाठविण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या ‘न्यू मेट्रो पॉलिसी’नुसार पीएमआरडीएच्या मेट्रोचा प्रस्ताव तयार केलाआहे. तसेच केंद्र शासनाने मेट्रोसनिधी देण्यासाठी काही अटीटाकल्या आहेत.या अटींची पूर्तता करणारा प्रस्ताव केंद्राच्या समितीकडे सादर करण्यात आला आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पीएमआरडीएच्या अधिकाºयांचा वेळ अटी व त्रुटींची उत्तरे देण्यातच जात आहे. त्यामुळे केंद्राकडून निधी मिळण्यास आणखी किती दिवस लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘पीएमआरडीए’ची मेट्रो अडकली केंद्राच्या फे-यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:02 AM