शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

पालखीसाठी पीएमपीच्या ९७ जादा गाड्या सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2016 12:52 AM

अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या संत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पीएमपीकडून तब्बल ९७ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

पुणे : अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या संत ज्ञानेश्वरमहाराज व संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पीएमपीकडून तब्बल ९७ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने आळंदी आणि देहूसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्र आळंदीसाठी ६५, तर देहूसाठी २० बसेस मार्गावर धावणार आहेत. याशिवाय देहू ते आळंदी या मार्गासाठी बारा बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून शुक्रवारी देण्यात आली. पालखी सोहळ्यानिमित्त शहर, उपनगरांबरोबरच गावागावांतून आळंदी आणि देहू येथे भाविकांची गर्दी होते. त्यामुळे पीएमपीकडून दरवर्षी जादा बसेसचे नियोजन करण्यात येते. २५ ते २९ जूनपर्यंत यंदाही आळंदीसाठी स्वारगेट, मनपा भवन, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरीरोड या ठिकाणावरून सध्या संचलनात असलेल्या आणि जादा अशा दररोज एकूण ६५ बसेस सोडण्यात येणार आहेत. २८ जून रोजी रात्री १२ पर्यंत आळंदीसाठी बसेस ठेवण्यात आल्या आहेत. देहूकरता पुणे स्टेशन, मनपा, निगडी या ठिकाणाहून सध्या संचलनात असललेल्या व जादा अशा एकूण २० बसेस सोडण्यात येणार आहे. २९ जून रोजी रोजी पालखी प्रस्थान आळंदी येथून होणार असल्यामुळे पहाटे तीनपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा भवन येथून जादा ३२ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.पालखीच्या हडपसर मुक्कामावेळी महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजे-माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड आणि आळंदी या ठिकाणी जाण्यासाठी बसव्यवस्था करण्यात आली आहे. कात्रज-कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर, तसेच वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा उपलब्ध आहे. पालखीदरम्यान दिवे घाट बंद राहणार असल्यामुळे बोपदेव घाटमार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.