पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)मध्ये विविध वरिष्ठ पदांवर कार्यरत असलेल्या एसटी महामंडळातील तीन निवृत्त अधिका-यांची मुदत महिनाअखेरीस संपत आहे. या अधिकाºयांना मुदतवाढ देण्यावरून ‘पीएमपी’मध्ये खलबते सुरू आहे. काही अधिकारी व कर्मचारी संघटनांचा या अधिकाºयांच्या नियुक्तीला विरोध असल्याने त्यांना पीएमपीची दारे बंद होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘पीएमपी’चे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात पीएमपीचा नवीन आस्थापना आराखडा तयार केला होता. त्यानुसार त्यांनी काही वरिष्ठ पदांसाठी एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या अधिकाºयांची करार पद्धतीने नियुक्ती केली. या अधिकाºयांवर त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाºया सोपविल्या. मुंढे यांचा हा निर्णयही वादग्रस्त ठरला. पदोन्नतीसाठी पात्र असलेले अनेक अधिकारी त्यामुळे नाराज झाले. याबाबत काहींनी उघडपणे नाराजीही व्यक्त केली; पण मुंढे यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहून संबंधित अधिकाºयांची नियुक्ती कायम ठेवली. एसटीतील अनुभवाचा पीएमपीला फायदा होईल, असे त्यांचे म्हणणे होते.या अधिकाºयांमुळे पीएमपीचे नुकसान झाल्याचा दावा यात करण्यात आला. तसेच त्यांना मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या वाहतूक व्यवस्थापक, महाव्यवस्थापक (वाहतूक) आणि प्रशासन अधिकारी या पदांवर एसटीतील निवृत्त अधिकारी कार्यरत आहेत. त्यांची मुदत महिनाअखेरीस संपत आहे. यापैकी एका अधिकाºयाची मुदत यापूर्वीच संपली असून त्याला महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता ही मुदतही संपत आल्याने कर्मचारी संघटना व काही अधिकारी सक्रिय झाले आहेत. या अधिकाºयांमुळे ‘पीएमपी’च्या संचालनावर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नसल्याचे ठामपणे ते सांगत आहेत. मुंढे यांनी यापूर्वी घेतलेले अनेक निर्णय बदलण्यात आले आहेत. त्यामुळे आता एसटीतील अधिकाºयांनाही पुन्हा ‘पीएमपी’त घेतले जाणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. एकंदर स्थिती पाहता, पीएमपीतील अधिकाºयांनाच पदोन्नतीद्वारे संबंधित पदांवर नियुक्त केली जाण्याची शक्यता असल्याचे काही अधिकाºयांनी सांगितले.सतत विरोध केलापीएमपीतील काही अधिकारी व कर्मचारी संघटनांनी मात्र मुंढे यांनी केलेल्या नियुक्तीवर टीका करीत या अधिकाºयांना सतत विरोध केला. याबाबत इंटकने सध्याच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना लेखी निवेदन दिले.
एसटीतील अधिकाऱ्यांना पीएमपीचे दार बंद? पीएमपीमध्ये खलबते
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 1:31 AM