हणमंत पाटील ल्ल पुणे/वारजेपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कारभाराला आर्थिक शिस्त लावण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी स्वत:च्या सेवेत एकच वाहनचालक ठेवला आहे. मात्र, इतर सहा अधिकाऱ्यांच्या सेवेत दोन ते तीन वाहनचालक कार्यरत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या वेतनापेक्षा त्यांच्या सेवेतील वाहने व चालकांवर मनमानी खर्च होत असल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. पीएमपीचा कारभार हाती घेतल्यानंतर, ८० टक्के बस रस्त्यावर धावणार नाहीत, तोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वाढीव वेतन व सुट्ट्या बंद करण्याचे आदेश डॉ. परदेशी यांनी काढले. त्यामुळे प्रशासनावरील अनाठायी खर्च कमी होऊन त्यांची कार्यक्षमता वाढण्याचा त्यामागे उद्देश होता. मात्र, डॉ. परदेशी यांच्यानंतर वरिष्ठ पदावर असलेले सहव्यवस्थापकीय संचालक, वाहतूक व्यवस्थापक, मुख्य अभियंता, प्रशासन अधिकारी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, बीआरटी व्यवस्थापक व वरिष्ठ कामगार व्यवस्थापक यांच्या दिमतीला विविध शिफ्टमध्ये दोन ते तीन सेवक कार्यरत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या चारचाकी गाडीसाठी बसचे चालक सेवेत आहेत. या सेवकांना साधारण महिना ३० ते ३५ हजार पगार आहेत. एका अधिकाऱ्याच्या सेवेत दोन चालक म्हणजे ६५ ते ७० हजार खर्च होतो. त्यामध्ये गाडीचे इंधन व देखभाल दुरुस्तीसाठी होणारा खर्च वेगळा असून, तो गृहीत धरल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारापेक्षा गाडी व सेवकांवर अधिक खर्र्च होत आहे. पीएमपीची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्याचे भान असल्याने महाव्यवस्थापक टी. एस. धारूरकर व भांडार अधिकारी रमेश चव्हाण यांनी चारचाकी वाहन वापरण्यास नकार देऊन दुचाकीवर किंवा पीएमपीने कार्यालयात येण्याचा आदर्श घालून दिला आहे. त्याप्रमाणे इतर अधिकाऱ्यांनीही पीएमपीने प्रवास केल्यास त्यांना प्रवाशांच्या अडचणी, विनातिकीट प्रवाशी शोधणे व चालक-वाहकांच्या समस्या समजू शकतील. डॉ. श्रीकर परदेशी यांनी अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीएमपी बसने प्रवास करून कार्यालयात यावे. बसने प्रवास केल्यास त्यांना प्रवाशांच्या अडचणी, विनातिकीट प्रवाशी शोधणे व चालक-वाहकांच्या समस्या समजू शकतील. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करीत आहे.- जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवाशी मंच. बदल्यानंतरही दिमतीला गाडीगेल्या अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या डॉ. परदेशी यांनी बदल्या केल्या. पण पूर्वीच्या विभागात असताना कामासाठी घेतलेल्या तेथील गाडी व सेवकवर्ग बदलीच्या ठिकाणीही दिमतीला आहे. पीएमपी अधिकारीवाहनचालक व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्षएकसहव्यवस्थापकीय संचालक तीन मुख्य अभियंतादोन प्रशासन अधिकारीदोन मुख्य वित्त व लेखा अधिकारीदोन बीआरटी व्यवस्थापकदोन वरिष्ठ वर्क मॅनेजरदोन
अधिकाऱ्यांच्या बडेजावाने पीएमपी तोट्यात
By admin | Published: February 07, 2015 12:36 AM