मार्केट यार्ड ते मारणेवाडी ही साडेआठ वाजता सुटणारी बस नेहमीप्रमाणे ४० प्रवाशांना घेऊन पिरंगुटच्या दिशेने जात होती. त्यावेळी चांदणी चौकात बावधन गावाच्या हादीत बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे चालक विक्रम सिंह गरूड यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून त्यांनी बस बाजूला घेत कंडक्टर अभिजीत साबळे यांना प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यास सांगितले. बस मध्ये साधारण 35 ते 40 प्रवाशांसह दोन पत्रकारदेखील होते. त्यातील एक पत्रकार प्रतिक्षा ननावरे यांनी या घटनेची माहिती मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला दिली. तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद बलकवडे सह त्यांची टीम घटनास्थळी काही वेळातच पोहोचली. या वेळी कोथरूड अग्निशामक दल आणि वारजे अग्निशामक दलही घटनास्थळी दाखल झाले होते. मोठ्या प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावेळी बावधन पोलीस चौकीचे पी एस आय साळूंके, हवलदार विजय गायकवाड, व्हायाळ, सुनील जाधव, तसेच जवळच असणारे ट्राफिक पोलीस यांनी घटनास्थळाजवळ जमलेल्या आणि प्रवाशांना लांब ठेवण्याचे विशेष प्रयत्न केले.
कोथरूड फायर स्टेशन आणि वारजे फायर स्टेशन सचिन मांडवकर, गजानन पाथरूडकर, यांच्यासह बाबूराव शितकल, अमोल पवार, दीपक पाटील, महेश शिळीमकर, सागर सोनवने, राजेंद्र पायगुडे, जयश लबडे, निलेश तागुंदे, रुपेश जांभळे, अतुल ढगळे, यांच्या अथक प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला, सर्व प्रवाशी सुखरूप असून पी एमटी बस मात्र यात जळून खाक झाली आहे.