याप्रसंगी सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांसह अनेक नगरसेवक, काँग्रेस - राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या बससेवेमुळे सासवड - जेजुरी मार्गावरील विविध गावांतील प्रवासी नागरिकांच्या मागणीची पूर्तता झाली आहे. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, नोकरदार, कामगार या सर्वांचीच सोया होणार असून दर अर्धा तासाने या मार्गावर या बसच्या फेऱ्या चालू राहणार आहेत. शुभारंभाच्या फेरीत आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोकराव टेकवडे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जेजुरीच्या वीणा सोनवणे, जि प सदस्य दत्ता झुरंगे, पं स सदस्या सुनीता कोलते आदी उपस्थित होते.
दरम्यान, सासवड येथे शहर राष्ट्रवादीच्या वतीने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने दाखविण्यात आले. याप्रसंगी पालिकेच्या महिला सफाई कर्मचा-यांना साड्या वाटप, दिव्यांगांना व्हील चेअर वाटप तसेच ग्रामीण रुग्णालय, आशा सेविका तसेच पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक, आरोग्यप्रमुख मोहन चव्हाण याना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले.
येथील रघुनाथ साबळे औषधनिर्माण महाविद्यालयात पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्या डॉ राजश्री चव्हाण यांसह शिक्षक उपस्थित होते. खा पवारांच्या वाढदिवसानिमित्त गेली अनेक वर्षे सातत्याने राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराचे आयोजन यावर्षीही सोमवारी ( दि १४ ) सासवड येथे करण्यात येणार असल्याची माहिती आयोजन शिवाजी पोमण यांनी दिली.
--