पुणे : लावणी म्हटलं की आपल्याला आठवते ती ढोलकी ची थाप आणि शृंगार रस! पण ''लावणी' या विषयावरचे अनोखे कविसंमेलन रंगत-संगत प्रतिष्ठानच्या वतीने रंगले. 'औंदा लगीन करायचं'...' चैत्र वैशाखात ऊन होईना सहन थंडगार हवेत मला फिरवा'... दागदागिन्यांचा जाच भारी होई सख्या संगे संग साधतच नाही अशा शृंगारिक शब्दांनी लावणीचा काव्यरूपी आनंद रसिकांनी लुटला.
या कार्यक्रमाची संकल्पना मैथिली आडकर यांची होती. ऋचा घाणेकर, प्रज्ञा महाजन, रेखा देशमुख, मीना शिंदे सीताराम नरके, राजश्री महाजनी, वर्षा हळबे, निलाक्षी महाडिक, रूपाली अवचरे, सुजाता पवार, गीतांजली सटाणेकर, अरुण सावंत, कामिनी केंभावी, मन्मथ बेलुरे आदि कवींनी लावणी या विषयावरील कविता सादर केल्या. लावणी आणि महाराष्ट्र यांचं नातं जोडत ॲड. प्रमोद आडकर यांनी कवींचे स्वागत केले. प्रभा सोनवणे आणि शिल्पा देशपांडे यांनी समन्वयाची भूमिका बजावली. कामिनी केंभावे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून कवी संमेलन रसिकांपर्यंत पोहोचवले. स्वाती सामक यांनी आभार मानले.
-----------------------------------------