शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आपल्या भवतालचा आवाजच असते कविता! - कल्पना दुधाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 3:39 AM

महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणून कविता करता येत नाही.

महाराष्ट्र फाउंडेशनचा ललित ग्रंथ पुरस्कार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या ‘धग असतेच आसपास’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहेच; मात्र प्रतिष्ठित पुरस्कारांचे दडपणही येते. कवितासंग्रह लिहायचा किंवा कविता करायची, असे म्हणून कविता करता येत नाही. आपल्या भवतालच्या परिस्थितीतून कविता उत्स्फूर्तपणे जन्माला येत असते. कवीने आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. परिस्थितीच्या, भवतालच्या संवेदना मनाला भिडल्या तरच कविता कागदावर उतरते, असे मत दुधाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद तर झाला आहेच; मात्र, अशा पुरस्कारांचे काहीसे दडपणही जाणवते. प्रतिष्ठित पुरस्कारांबद्दल बरेच काही ऐकले होते. पण, ते आपल्या इतके जवळ येतील, असे कधीच वाटले नव्हते. पुरस्कारांचा संबंध केवळ शहरी लोकांपुरताच मर्यादित असतो, असा समज सर्वदूर पसरलेला आहे. त्यामुळे शेतात काम करणाºया, मातीत रमणाºया व्यक्तींपर्यंत पुरस्कार पोहोचणे खूप अनोखे असते. हा केवळ माझा सन्मान नसून माझ्यासह शेतात राबणाºया गोरगरिबांचा हा सन्मान आहे.मी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील कारकिर्दीची स्वप्ने रंगवत होते. एवढे शिक्षण घेतल्यानंतर शेती करायची नाही, असे मनाशी ठरवून टाकले होते. शिक्षणाची हवा डोक्यात गेली होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरीही नाईलाजाने मला शेती करावी लागली. जे टाळायचे होते, तेच करण्याची वेळ ओढवल्याने मनात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती. कवितेच्या माध्यमातून अस्वस्थतेला वाचा फुटत गेली. मनातील भावना कवितांच्या रूपाने बाहेर पडू लागल्या. कवितेमुळेच शेतीची कधी आणि कशी गोडी लागत गेली हे कळलेच नाही. कालांतराने मी शेतीतच रमू लागले. तेच माझे विश्व बनले.माझ्याभोवती जे घडते, त्यातूनच कविता सुचत जाते. शेती, मातीतले वास्तव कवितेच्या माध्यमातून मूर्तरूप धारण करते. ‘सिझर कर म्हणते माती’ हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. शेतीमध्ये दररोज अनेक प्रयोग केले जात आहेत. रासायनिक खतांचा वापर, नवे तंत्रज्ञान यामुळे कृत्रिमता निर्माण झाल्याने मातीची नैसर्गिकता हरवत चालली आहे. मातीवर अतिक्रमण होऊ घातले आहे, या विचारांतून शेतात काम करत असतानाच मला ही कविता सुचली. पुढे अशाच कविता सुचत गेल्या आणि कवितासंग्रह तयार झाला. ‘धग असतेच आसपास’ ही कविताही अशीच भोवतालचे वातावरण अनुभवत असताना सुचलेली. आपल्या आजूबाजूची माणसे, वातावरण यात धग धुमसत असतेच; त्याची झळ आपल्यापर्यंत पोचू द्यायची की त्यातून मार्ग काढायचा, हे आपल्याच हातात असते, अशी भावना या कवितेतून उमटली.कविता लिहायची, असे मी काहीच ठरवले नव्हते. माझे अनुभवविश्व, बदलते वास्तव, समाजातील प्रश्न, माणसे यातून कविता आपोआप सुचत गेल्या. कोणाची कविता चांगली किंवा वाईट, असे ठरवता येत नाही. प्रत्येकाचे अनुभवविश्व, वैचारिक दृष्टिकोन याप्रमाणे त्या त्या कवितेचा बाज ठरत जातो. कवितेसाठी साधना, रियाज किंवा अभ्यास गरजेचा असतो की नाही, मला माहीत नाही.स्वत:पुरतेच बोलायचे झाले, तर मी कवितेचा कोणताही अभ्यास केला नाही. कारण, कविता संवेदनशीलतेतून प्रकटते. कवितेत कोणताही अभिनिवेश असता कामा नये. मी शहरी बाजाची कविता लिहायची ठरवल्यास ती सुचणारच नाही. कारण, मी ते वातावरण अनुभवलेच नसेल, तर त्या भावना माझ्या मनाला भिडणारच नाहीत.कवी संमेलनांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळते. माझ्या कवितेतील बहुतांश शब्द ग्रामीण ढंगाचे असल्याने ग्रामीण भागातील लोकांना ते पटकन भावतात. त्या तुलनेत, शहरी भागातील रसिकांना त्या समजून घ्याव्या लागतात. मात्र, एखाद्याला कविता समजावी, म्हणून ती सोप्या भाषेत लिहिणे शक्य नसते. कवीने आपल्या अनुभवांशी प्रामाणिक असले पाहिजे.आपण आपल्या भावनांशी प्रामाणिक असू, तर कविमन आपल्याला साथ देते आणि कविता स्फुरत जातात. कवितांचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

टॅग्स :Puneपुणे