खोडद : दुपारच्या वेळी तहान लागली म्हणून मेंढपाळाने शेतात सोडलेले युरियामिश्रित पाणी मेंढ्या व शेळ्यांना पाजल्याने १२ मेंढ्या, १० शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना आज मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास हिवरेतर्फे नारायणगाव येथे घडली.याबाबत माहिती अशी की, हिवरे तर्फे नारायणगाव येथील मेंढपाळ व्यवसायिक संतोष बंडू तांबे व आनंदा सिताराम करगळ हे आपल्या २२५ शेळ्या मेंढ्या घेऊन कळमजाई मळा येथील भालेराव वस्तीजवळच्या परिसरात चारण्यासाठी आज सकाळी घेऊन गेले होते.या परीसरातील शेतकऱ्यांने आपल्या शेतातील पिकांना पाण्यातून युरिया खत सोडले होते. दुपारी १२ च्या सुमारास शेळ्या मेंढ्यांना तहान लागली म्हणून या मेंढपाळांनी या शेतात सोडलेले पाणी शेळ्या मेंढ्यांना पाजले, यानंतर पुढील अर्ध्या तासात काही शेळ्या, मेंढ्या सैरभैर होऊन इकडे तिकडे पळू लागल्या व एक एक शेळी, मेंढी खाली पडून मृत होऊ लागली.तलाठी शितल गर्जे व संजय गाडेकर यांनी पंचनामा केला. पशुधन विकास अधिकारी एस.के.कुमकर यांनी शवविच्छेदन केले. (वार्ताहर)
पाण्यातून विषबाधा
By admin | Published: April 08, 2015 3:43 AM