पुणे : शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या माॅडेल काॅलनी येथील घरात सकाळी 5 च्या सुमारास विषारी साप अाढळला. गोऱ्हे यांच्या संरक्षणार्थ असलेले पाेलीस शिपाई बद्रीनाथ देवरे यांच्या ही बाब निदर्शनास अाली. घरातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या सापाला पकडून कात्रज सर्पाेद्यानाकडे सूपूर्त करण्यात अाले. गोऱ्हे यांच्या घरी विषारी साप अाढळल्याने खबरदारी घेण्यात येत अाहे.
पुण्यातील माॅडेल काॅलनी या भागात निलम गोऱ्हे यांचे निवासस्थान व कार्यालय अाहे. गुरुवारी सकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या घरातील कार्यालयात 3 फूट लांबीचा हिरवळ हा विषारी साप अाढळला. ही बाब लक्षात येताच गोऱ्हे यांच्या संरक्षणार्थ असलेले पाेलीस शिपाई बद्रीनाथ देवरे यांनी गणेश कुलथे यांच्या मदतीने या सापाला सुरक्षितरित्या पकडून एका बाटलीत ठेवले. त्यानंतर पुण्यातील कात्रज सर्प उद्यानाशी संपर्क करुन त्या सापाला सर्पमित्र राहुल रणधीर यांच्याकडे सुपूर्द करण्यात अाले. सकाळी निलम गोऱ्हे यांना या घटनेची माहिती देण्यात अाली. तसेच महापालिकेशी संपर्क करुन गोऱ्हे यांच्या घराजवळील परीसराची पाहणी करण्यास सांगण्यात अाले.
दरम्यान घराजवळ विषारी साप अाढळल्याने गोऱ्हे यांच्याकडील सर्व कर्मचारी सतर्क झाले असून खबरदारी घेण्यात येत अाहे.