मार्गासनी: सुट्टीच्या दिवशी मोकाट फिरणाऱ्यांवर वेल्हे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आज एका दिवसात ७५ हजारांचा दंड वसूल केला आहे. अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, वेल्हे तालुक्यात किल्ले राजगड किल्ले तोरणा व मढेघाट या वर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तरी देखील काही मोकाट पर्यटक सुट्टीच्या दिवशी या परिसरात आले होते. करंजावणे येथे पोलिसांनी चेक पोस्ट लावला होता. या चेकपोस्टवर दिवसभरात पोलिसांकडून पंच्याहत्तर हजाराचा दंड आज एका दिवसात वसूल केलेला आहे.
पाच जूनला किल्ले तोरण्यावर किल्ल्याची नासधूस करण्यात आलेली होती. तसेच बेकायदेशीरपणे उत्खनन सुरू होते. आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी किल्ले राजगड व किल्ले तोरणा यांच्यावर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तरी देखील आज हौशी पर्यटक आलेले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.