उदय सदाशिव देशपांडे (हाॅटेल देशपांडे व्हेज महात्मा फुले सर्कल टेंभुर्णी नाका) व सूर्यकांत दगडू जाधव (हाॅटेल गीरजाई, बाबा चौक) गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत, तर याबाबतची फिर्याद पो. काॅ. अमोल रामदास गारूडी व संजय बबन कोठावळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
रविवार दि ४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ ते १०:४५ वा.चे दरम्यान त्यांचे स्वमालकीची हाॅटेल्स उघडी ठेवली व हाॅटेलमध्ये गर्दी जमवून खाद्यपदार्थ विक्री सुरू ठेवून नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आल्याने वरील दोन हाॅटेलमालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली असून पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.