यवत : चौफुला नजीक हॉटेल धनश्री येथे अचानक छापा घातला असता स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आली. बारामती गुन्हे अन्वेषण विभागाने आणि जवान आणि यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि जवान यांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली .
हॉटेल धनश्री येथे वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या ३ आरोपींना ताब्यात घेऊन २ महिलांची सुटका केली. त्यांना महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे पियुष रामचंद्र देशमुख (वय 22 रा. केडगाव, ता.दौंड ), कृष्णा संजय गोंगाने (रा. हिंगोली ), प्रशांत श्रावण मोहोड ( वय 35 रा. चांदुर रेल्वे, जि. अमरावती) असे आहेत. त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडूनरोख रक्कम, मोबाईल हँडसेट, आदी ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पो स्टे चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या पथकाने केली. .