केडगाव : खुटबाव ता. दौंड येथे मटका घेणाऱ्या इसमावर कारवाई करून ३,३१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी तीन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना खुटबाव, (ता. दौंड, जि. पुणे) या गावच्या हद्दीमध्ये इंदीरानगर येथे दोन इसम कल्याण मटका नामक जुगाराची साधने जवळ बाळगुन आपल्या ओळखीच्या लोकांकडुन पैसे घेऊन मुंबई मटका हा जुगार खेळवित असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सहा. फौजदार गोविंद भोसले, पोलीस हवालदार पोलीस हवालदार गुरू गायकवाड, राम जगताप, महेद्र चांदणे, पोलीस नाईक निखील रणदिवे यांच्या पथकाने कारवाई केली.
खुटबाव च्या हद्दीत असणाऱ्या इंदीरानगर येथे जावुन अचानक छापा टाकला असता या ठिकाणी १) राजेंद्र यादव घोडके (वय ५० वर्षे, रा. खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे) २) राजकुमार दगडुलाल शर्मा (वय ६६ वर्षे, रा. बोरीपार्धी, बेथल कॉलनी, ता. दौंड, जि.पुणे ) मटका खेळवीत असणाऱ्या या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्याजवळ कल्याण मटका जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकुण ३,३१० रुपये किंमतीचा मुद्देमाल माल मिळुन आला. वरील आरोपिंनी मटक्याचे सर्व पैसे गोळा करून गोटु पवार (रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) याच्याकडे जमा करीत असलेबाबत सांगितले. त्यामुळे वरील आरोपी आणि गोटु पवार (रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) या तिघांविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम १२ (अ) प्रमाणे गुन्हादाखल करण्यात आला आहे.