शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

पोलिसांना अपशब्द वापरणा-यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 6:43 AM

रात्री उशिरा बाहेर थांबलेल्या चौघांना गस्त घालणा-या पोलिसांनी घरी जाण्यास सांगितल्याच्या कारणावरून चिडून चौघांनी पोलिसांना अपशब्द वापरून बघून घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. डहाणूकर कॉलनीतील लेन क्रमांक ३ मध्ये प्रगती अपार्टमेंट या इमारतीत असलेल्या बंद दुकानासमोर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला.

पुणे : रात्री उशिरा बाहेर थांबलेल्या चौघांना गस्त घालणा-या पोलिसांनी घरी जाण्यास सांगितल्याच्या कारणावरून चिडून चौघांनी पोलिसांना अपशब्द वापरून बघून घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. डहाणूकर कॉलनीतील लेन क्रमांक ३ मध्ये प्रगती अपार्टमेंट या इमारतीत असलेल्या बंद दुकानासमोर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला.पोलीस शिपाई जी. एस. मुलाणी यांनी याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रमेश शंकर पवार (वय २९), बबन शंकर पवार (वय २२, दोघेही रा. डहाणूकर कॉलनी), अजय केशव देवरे (वय २५, वडगाव) आणि रमेश मोतीराम राठोड (वय २२, उरुळी कांचन, ता. हवेली) या चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे डहाणूकर कॉलनीतील बंद दुकानासमोर बसलेले असताना मुलाणी यांनी त्यांना हटकले. येथे बसू नका आपापल्या घरी जा, असे मुलाणी यांनी आरोपींना सांगितले. त्यावर त्याने अपशब्द वापरले.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिसCrimeगुन्हा