पुणे : रस्त्यावरुन चालत माेबाईलवर बाेलत जाणाऱ्या नागरिकांच्या हातातील माेबाईल चाेरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पाेलिसांनी सापळा रचून अटक केली अाहे. त्यांच्याकडून एक बजाज पल्सर व एक विवाे कंपनीचा माेबाईल फाेन जप्त करण्यात अाला अाहे. त्यांच्याकडे अधिक चाैकशी केली असता त्यांनी शहरातील विविध भागांमध्ये माेबाईल चाेरी केल्याचे समाेर अाले. चाेरलेले माेबाईल फाेन त्यांनी त्यांच्या अाेळखीच्या लाेकांना त्यांनी विकले हाेते. पाेलिसांनी एक पल्सर अाणि सात माेबाईल फाेन असा एक लाख त्रेसष्ठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला अाहे.
संघटीत गुन्हेगारी विराेधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी 17 नाेव्हेंबर राेजी काेथरुड भागात गस्त घालत असताना पाेलीस नाईक निलेश शिवतारे यांना त्यांच्या बातमीदाराकडून खबर मिळाली की रस्त्याने माेबाईल फाेनवर बाेलणाऱ्या लाेकांच्या हातातील माेबाईल फाेन हिसका मारुन नेणारे तसेच वाहनाच्या डिकीतील फाेन चाेरणारे दाेघेजण काळ्या रंगाची पल्सरवरुन खिलारेवाडी येथे माेबाईल विकण्यासाठी येणार अाहेत. ही माहिती मिळताच पाेलिसांनी एरंडवणा - काेथरुड या भागात सापळा रचून शुभम रमेश लाेंढे (वय 21, रा. अंबिलअाेढा काॅलनी, दांडेकर पूल) व त्याचा साथीदार गणेश मानसिंग पवार (वय 23 रा. अांबेडकर नगर मार्केडयार्ड) यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या ताब्यातून एक बजाज पल्सर व एक विवाे कंपनीचा माेबाईल फाेन पाेलिसांनी जप्त केला.
पाेलिसांनी अाराेपींना विश्वासात घेऊन चाैकशी केली असता त्यांनी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहुन रस्त्याने माेबाईल फाेनवर बाेलत जाणारे लाेकांचे तसेच वाहनाच्या डिकीतील माेबाईल फाेन चाेरल्याची माहीती दिली. या माहतीच्या अाधारे त्यांच्या ताब्यातून सॅमसंग, लिनाेवा, विवाे, माेटाेराेला या कंपनीचे सात अॅन्ड्राॅईड माेबाईल फाेन जप्त केले अाहेत. त्यांनी शहरामध्ये काेंढवा, मार्केट यार्ड, तळजाई टेकडी, काेथरुड, बालाजीनर, धनकवडी या भागात माेबाईल चाेरल्याचे निष्पन्न झाले अाहे. पाेलिसांनी दाेघांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 21 नाेव्हेंबर पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे अादेश दिले अाहेत.