लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमविल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण केला. डीजे बंद करून शांततेत जाण्यास सांगितल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली, तर इतर ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास सहकारनगर येथील दाते बसथांब्याजवळ घडली. याबाबत पोलीस नाईक पी. सी. मरगजे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गणेश बाबूराव शिंदे (वय ४५), श्रावण बाबूराव शिंदे (वय २०, दोघे रा. सिद्धार्थनगर, सहकारनगर), सुमीत सुरेश शिर्के (वय २७, रा. आम्रपाली सोसायटी, अभिरुची मॉलच्या मागे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर रोहित शिंदे, राम गावडे, मंगेश राठोड, जावेद खाजुद्दीन पठाण, अभिजित सुरेश जाधव यांच्यासह दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस ठाण्याचे मोबाईल वाहन अडविले आणि ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना वाहनामधून बाहेर काढून सरकारी कामात अडथळा आणला. या गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक व्ही. के. कोळी करीत आहेत.बेकायदा जमावामुळे वाहतुकीला अडथळापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अटक केलेल्या व गुन्हा दाखल केलेल्या आरोपींनी सहकारनगर येथील दाते बसथांब्याजवळ सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमविल्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. त्या वेळी तेथे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तेथेच थांबून डीजे लावला. फिर्यादी यांनी त्यांना डीजे बंद करण्यास सांगितले; त्यामुळे यातील व्यक्तींनी फिर्यादी यांना धक्काबुक्की केली.
पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या तिघांना अटक
By admin | Published: May 07, 2017 3:17 AM