मौजे पेमदरा येथे जालिंदर दगडू बेलकर हे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. ते त्यांच्या मित्रांसोबत मंगळवारी (दि.२) दुपारी २.३० चे सुमारास पेमदरा येथील महाराजा हॉटेल येथे जेवणासाठी गेले असताना सोपान संतू बेलकर व त्यांचा मित्र दत्ता ठका दाते यांनी तेथे जाऊन जुन्या वादाच्या रागातून जालिंदर बेलकर यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व निघून गेले. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास पेमदरा गावाजवळ असलेल्या पुलावर एकट्याला गाठून सोपान बेलकर व दत्ता दाते यांनी जालिंदर बेलकर यास काठीने मारहाण करून गाडीखाली घालून जिवे मारण्याची धमकी दिली.
जालिंदर बेलकर यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार भोसले पुढील तपास करीत आहेत.