शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

देहू गावात थैमान घालणाऱ्या वाळू माफियांना पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:10 PM

पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करून केले साहित्य जप्त

ठळक मुद्देग्रामस्थांच्या मागणीची पोलिसांनी घेतली दखल

देहूगाव-  इंद्रायणी नदीच्या पात्रात वसंत बंधाऱ्याच्या जवळ वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणी थैमान घालणाऱ्या वाळू माफियांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी दणका दिला आहे. पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसिलदार गीता गायकवाड यांनी कारवाई केली असून यात एक पोकलेन मशीन, दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर व त्यावर वाळू चाळण्याच्या चाळणी असलेले साहित्य जप्त केले आहे. देहूगाव येथे गेल्या काही दिवसांपासुन वाळू माफियांनी थैमान घालते होते. याबाबत काही नागरिकांनी अप्पर तहसिलदार गीता गायकवाड यांच्या कडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत त्यांनी गुरुवारी पहाटे ४ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास छापा टाकून कारवाई  केली. 

या कारवाईत जप्त केलेल्या वाहनांवर कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट दिसून येत नाही. मात्र त्यांचे चासिस नंबर मिळाले आहेत.  याकारवाई मध्ये निवासी नायब तहसिलदार प्रविण ढमाले, अव्वल कारकुन गणेश सोमवंशी, उन्मेश मुळे, अंकुश आटोळे, तलाठी अतुल गीते, पोलीस पाटील चंद्रसेन टिळेकर, सुभाष चव्हाण व कोतवाल संभाजी मुसुडगे हे सहभागी झाले होते. या भागात वाळू माफियांचे मोठे रॅकेट असावे व काही स्थानिकांचीही मदत असावी अशी चर्चा गावात आहे. त्यामुळे या सर्वांच्या मुसक्या आवळाव्यात अशी येथील ग्रामस्थांची मागणी केली होती. 

वाळू उपसल्याने भविष्यात बंधाऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता 

देहूगाव येथील वसंत बंधाऱ्याच्या जवळ गेल्या काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात होता. या भागात शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी साधारण पन्नास वर्षांपुर्वी वसंत बंधारा बांधण्यात आला होता. याच बंधाऱ्याच्या जवळ वाळू उपसा होत असल्याने हा बंधारा धोकादायक झाला आहे. शिवाय या बंधाऱ्याच्या पायामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. परिणामी या बंधाऱ्यात पुर्ण क्षमतेने पाणी साठविले न जाता पाणी गळतीच जास्त होते. यामुळे शेतीला पाणी पुरवठा करणे अवघड होते. या ठिकाणी पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने वसंत बंधाऱ्याच्या परिसरातील पाणी पातळी कमी झाली की या भागात वाळू माफिया वाळू काढतात. स्थानिक भागात त्याची विक्री मोठ्या प्रमाणात करतात. जर भविष्यात या बंधाऱ्याला नुकसान झाले. त्याला जबाबदार हेच वाळू माफिया असणार आहेत. कारण त्यामुळे शासनाच्या महसुलावर परिणाम होणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसdehuदेहूArrestअटक