शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

बंदोबस्ताबरोबरच पोलीस बनले ‘मदतदूत’; लोकांनी घरी राहावे म्हणून करताहेत हे काम 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 9:35 PM

सोशल पोलिसिंग सेलमार्फत केली जात आहेत मदत..

ठळक मुद्देअपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोशल पोलिसिंग सेल २५ मार्चपासून कार्यन्वित काही ठिकाणी आता घरपोचकिराणा सामान पोहचविण्याचा प्रयत्न सुरु मेडिकल असोशिएशनचे प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या १९ डॉक्टरांच्या संघटना यांच्याशी सुसंवाद पोलिसांचा शहरातील तब्बल १६३ स्वयंसेवी संस्थांशी समन्वय

पुणे :  लॉकडाऊनच्या काळात कायदा सुव्यवस्था सांभाळण्याबरोबरच पोलिसांना अनेक कामे करावी लागत आहे. या काळात पोलीस केवळ रस्त्यावरच उतरले नाही तर शहरातील अगदी उच्चभ्रु समाजातील लोकांनापासून अगदी रस्त्यावर राहणाऱ्या  मजूरांपर्यंत समाजाच्या सर्व घटकांपर्यंत आपल्या मदतीचा हात वेगवेगळ्या मागार्ने पुरवित आहे. लोकांनी घरात रहावे म्हणून त्यांनी लोकांना झोडपले़, लोकांना भर रस्त्यावर उठाबश्या काढायला लावल्या,याची चर्चा आणि व्हिडिओ खूप व्हायरल झाले. पण, त्यापुढे जाऊन गेले महिन्याभर पोलीस सोशल पोलिसिंग सेलच्या माध्यमातून आतापर्यंत ६ लाख अन्न पाकिटांचे वितरण केले आहे.अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोशल पोलिसिंग सेल २५ मार्चपासून कार्यन्वित झाला आहे.  त्याचबरोबर आजवर कधीही न केलेली असंख्य कामे सध्या शहर पोलीस करीत आहेत. त्यासाठी शहरातील तब्बल १६३ स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधण्यात आला आहे. होम क्वारंटाईन केलेलेसर्व घरीच रहात आहे. पोलिसांचा  ना याची दररोज तपासणी केली जात आहे. त्याचवेळी गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी नवीन काम सुरु केले आहे. शहरातील मध्य वस्तीत साडेतीन हजार देवदासी, ६०० तृतीयपंथी, हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले व त्यांची देखभाल करणारे अशा सर्वांना मार्फत जेवण, फुड पॅकेट पुरविण्यात येत आहे. रस्त्यावर राहणाऱ्या १३६५ बेघरांना शेल्टरमध्ये सोय, त्यांच्या जेवणाची सोय केली आहे. ४९ मजूर कॅम्पमधील १७हजार लोकांना मदत पुरविण्यात येत आहे़.डेक्कन जिमखाना, लॉ कॉलेज रोड, शिवाजीनगर या भागातील मोठ्या सोसायट्यांसाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत भाजीपाला विक्रीचे व्यवस्थापन सुरु आहे. शहरातील ७६३ किराणा दुकानदारदारांशी ट्रॅक वॉच या संकेत स्थळावरुन ग्राहक आपली सामानाची यादी देऊन सामान घेऊ शकतात. काही ठिकाणी आता घरपोचकिराणा सामान पोहचविण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुण्यातील इंडियन मेडिकल असोशिएशनचे प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या १९ डॉक्टरांच्या संघटना यांच्याशी सुसंवाद साधून कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांनी दवाखाने उघडे ठेवावेत, यासाठी डॉ. शिंदे यांनी व्यक्तीश प्रयत्न केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.......शहरातील ८०० पॉझिटिव्ह राहतात, मिनी हॉटस्पॉट त्यांच्या बाजूच्या प्रत्येकी १० घरातील लोकांनी घरातच रहावे, यासाठी सॅनिटायझर, मास्क, साबण पुरविणे व साहित्य वाटप करण्यात येत आहे. इतके करुनही लोक घराबाहेर पडत असल्याने वाहन रस्त्यावर आणणाऱ्यांनी पूर्वी केलेल्या वाहतुक नियमभंगाच्या गुन्हांच्या दंड वसुली करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांना सर्व आवश्यक ती काळजी घेण्यास सांगितले आहे़. लोकांना रस्त्यावर प्रतिबंधित करण्याचा कायदेशीर उपाय म्हणून ही कारवाई आता सुरु असल्याचे डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.....शहरात इतके भितीचे वातावरण असताना, लोकांच्या आजू बाजूला राहणारे कोरोनाबाधित झाल्याचे दिसून येत असताना आपल्याला काही होणार नाही, असे समजून लोक कसे घराबाहेर पडतात, याचेच आश्चर्य वाटत असल्याचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसdoctorडॉक्टरsocial workerसमाजसेवक