वाकड, दि. 29 - पिंपरी-चिंचवड शहरातील मुंबई-बंगळरु महामार्गालत ताथवडेत गेल्या अनेक महिन्यापासून महाविद्यालयीन तरुणींच्या नावाखाली कोट्यावधींची उलाढाल सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचे लोकमतने ७, ८, ९ जुलैच्या अंकात तीन दिवसीय स्टिंग ऑपरेशनद्वारे भांडाफोड केला होता. लोकमतच्या या वृत्ताची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना सक्त कारवाईचे आदेश दिले. यात शहरभर अनेक अवैध धंद्यावर कारवाया आणि छापासत्र सुरु झाले तर सामाजिक सुरक्षा विभागाने आजवर सुमारे ८ कारवाया करून २२ तरुणींची सुटका करून १३ जणांना अटक केली आहे. तर शनिवारी (दि २९) पिंपरी-चिचंवड शहरातील पिंपळे सौदागर येथील एका इमारतीत स्पाच्या नावाखाली चालणारे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उध्वस्थ केले असून पोलिसांनी यातील थायलंडच्या पाच युवतीची सुटका करून मसाज पार्लर चालवणा-या दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी मसाज सेंटर मालक अमोल खंडू जाधव (वय ३१, रा. कोकणे चौक पिंपळे सौदागर), मॅनेजर दिलू गुआनबे जिबाहो ९वय २१ मूळ नागालँड) यांना ताब्यात घेवुण सांगावी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंदक कायदा कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करून त्या पाच तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.
टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या थायलंडच्या पाच तरुणींकडून आरोपी ज्यादा पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक नितीन लोंढे यांना मिळाली. त्यानुसर सामाजिक सुरक्षा विभागाने खात्री करण्यासाठी येथे छापा मारण्यात आल्याने सदरचा प्रकार समोर आला. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहनिरिक्षक शीतल भालेकर, चंद्रकांत जाधव, संदीप गायकवाड, संजय गिरमे, रमेश लोहकरे, नितीन तेलंगे, गीतांजली जाधव कविता नलावडे, सरस्वती कागणे, मानीत येळे, सचिन शिंदे यांच्या पथकाने केली.
सामाजिक सुरक्षा विभागाने लोकमतच्या वृत्तांनंतर केलेल्या कारवाई कोरेगाव पार्क (९ तरुणींची सुटका ५ अटक), मुंढवा- (२ तरुणींची सुटका, दोघांना अटक), बाणेर मध्ये वेगवेगळ्या दोन कारवाईत (५ थाईतरुणींची सुटका तीघे अटकेत, सांगवी - (५ तरुणींची सुटका, दोघांना अटक), भोसरी- (२ तरुणींची सुटका, १ महिला अटकेत)