शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
2
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
3
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
4
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
5
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
6
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
7
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
8
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
9
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
10
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
11
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
12
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
13
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
14
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
15
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
16
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
17
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
18
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
19
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
20
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

ज्येष्ठ नागरिकाच्या मारेकऱ्याला पोलीस कोठडी

By admin | Published: September 21, 2015 4:11 AM

घरामध्ये एकट्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा खून करून १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्याला न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

पुणे : घरामध्ये एकट्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा खून करून १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्याला न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने त्याला अटक केली आहे. चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला असून, आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील इलाहाबादचा रहिवासी आहे.राहुल जुग्गुलाल विश्वकर्मा (वय २०, रा. सम्राट चौक, विमाननगर) असे आरोपीचे नाव आहे. सतीशचंद्र गोपाळराव द्रविड (वय ८६, रा. व्हेलेनशिया सोसायटी, विमाननगर) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी स्वाती द्रविड (वय ५१, रा. विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. घरामध्ये एकट्या असलेल्या सतीशचंद्र यांच्या गळ्यावर चाकूने वार करून आरोपीने त्यांचा खून केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड, असा एकूण १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला होता. त्याच्या पायातील स्लिपरचा छाप घटनास्थळावर उमटला होता. पुढील तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची केलेली मागणी न्यायालयाने ती मंजूर केली. (प्रतिनिधी)