शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

पोलीस दर महिन्याला ७० - ८० लाख हप्ते घेतायेत, धंगेकरांचा आरोप तर अंधारेंनी वाचली यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 2:01 PM

पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? धंगेकरांचा सवाल

पुणे : पुणे अपघात प्रकरणात प्रचंड घडामोडी घडताना दिसून येत आहेत. शहरातील सरकारी अधिकाऱ्यांचे अक्षरश धाबे दणाणल्याचे चित्र आहे. पुणे शहर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली. आता या प्रकरणातून अग्रवालकडून पैसे घेणाऱ्यांची नावेही हळूहळू समोर येऊ लागली आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या प्रत्येक मुद्द्यांकडे बारकाईने लक्ष वेधून चव्हाट्यावर आणणारे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. त्यांच्याबरॊबर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा होत्या. 

धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्जच्या मुद्द्यावरुन चांगलेच सुनावले आहे. पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक यांच्याकडून दर महिन्याला किती हजार, लाख घेतात. चक्क याची यादीच वाचून दाखवली आहे. तुम्ही पाप करताय, खोट बोलू नका असे म्हणत दर महिन्याला ८०, ९० लाख हप्ते घेता असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्यात धंगेकरांनी पोलिसांची नावेही वाचून दाखवली आहेत.  

कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे हप्ते घेतात. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत, आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही.  या सगळ्या प्रकणामध्ये आम्ही पुणेकरांना नेस्तनाबुत होऊ देणार नाही. प्रत्येक ठिकाणी बार मध्ये वसुल्या केल्या जात आहे. आमच्या कडे सगळे पुरावे आहे आणि आम्ही आता गप्प बसणार नाही. सरकार काही करुद्या आम्ही रस्त्यावर उतणार असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिलाय. 

सुषमा अंधारेंनी हप्ता यादीच वाचून दाखवली

सुषमा अंधारे यांनी पुण्यामधील कोणत्या हॉटेलमधून, पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो याची यादीच वाचून दाखवली. काही हजारांपासून ते लाखांपर्यंत ही यादी असल्याचे सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवलेल्या यादीतून समोर आले. यावेळी शांत उभे राहून ऐकून घेण्याची वेळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली. सु अंधारे यांनी माध्यमांच्या कॅमेरांसमोरच पुण्यातून कोणत्या हॉटेलमधून कोणत्या पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो, याची माहिती दिली. त्यानंतर अधिकार्यांनी या सर्व बाबींची चौकशी केली जाईल असे आश्वासन अंधारे आणि धंगेकरांना दिले आहे. 

पब आणि हॉटेल्सच्या हप्त्यांची यादीच वाचून दाखवली..

द माफिया - १ लाख रुपयेएजंट जॅक्स - प्रत्येक आऊटलेटमागे प्रत्येकी ५० हजार रुपये (१० ते १२ आऊटलेट)टू बीएचके - १ लाख (राजबहादूर मिल्स)बॉलर- २ लाखडिमोरा - १ लाख (राजबहादूर मिल्स)मिलर - १ लाखटीटीएम रुफटॉप- ५० हजार (बाणेर)ब`क स्टेज - ९० हजारठिकाणा - दीड लाखस्काय स्टोरी -५० हजारजिमी दा ढाबा - ५० हजार (पाषाण)टोनी दा ढाबा - 50 हजारआयरिश - ४० हजारटल्ली टुल्स - ५० हजारअॅटमोस्पिअर - ६० हजाररुड लॉर्ड - ६० हजार२४ के - १ लाख ५० हजार (बालेवाडी)कोको रिको हॉटेल - ७५ हजार (भुगाव)स्मोकी बिज हॉटेल - ७५ हजार (भुकुम)सरोवर हॉटेल - १ लाख (भूगाव)यासह सनी होरा यांचे १८ हॉटेल, बार, २ वाईन शॉप, ३ बिअर शॉप व अन्य ठाबे - साडेतीन लाखबाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे ६६ बार, ३० वाईन शॉप, ३५ बिअर शॉप - साडेपाच लाखकैलास जगताप व अन्य यांचे ११ बार, ८ वाईन शॉप, ९ बिअर शॉप - अडीच लाख

तेव्हा मंत्र्यांनी आमच्यावर दबाव आणला

मागच्या वेळेला ललित पाटीलचं जे प्रकरण झालं तेव्हा आम्ही ते मांडायला गेलो तेव्हा मंत्री  शंभुराज देसाई यांनी आमच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ,केस टाकण्याची भाषा केली. आता त्यांच काय म्हणंण असेल. ललित पाटील यांच्या प्रकरणावेळी आम्ही अजय तावरे यांच नाव घेतलं तेव्हाचं त्यांना अटक करणं गरजेचं होतं. अजय तावरे, संजीव ठाकुर यांच्या अटकेची आम्ही जेव्हा जेव्हा मागणी केली  तेव्हा मंत्र्यांनी आमच्यावर दबाव आणला असं आरोप अंधारे यांनी केलाय. 

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीravindra dhangekarरविंद्र धंगेकरSushma Andhareसुषमा अंधारे