कुरवली :चिखली येथील हिरालाल विठ्ठल खोमणे पोलीस शिपाई सध्या नेमणूक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांना सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.माहे नोव्हेंबर २०२० मध्ये खोमणे व त्यांचे वरिष्ठ अधिकारी, सहकारी यांनी गुन्हे प्रकटीकरणमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे उपस्थित होते. सन २०११ सालापासून खोमणे पोलीस दलात कार्यरत आहेत. पुणे,सातारा जिल्ह्यासह नवी नवी मुंबई, कळंबोली या भागात दरोडा टाकणाऱ्या टोळीला जेरबंद केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.खोमणे यांना सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्कार मिळाल्याबद्दल बबन खोमण, विजय चव्हाण, दिलीप पांढरे, विजय पांढरे, बाळासाहेब रुपनवर, हरिश्चंद्र बंडगर ,मधुकर खरात, मारुती जाधव ,बाळासाहेब कदम, मधुकर कदम यांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
----------------------
फोटो ओळी : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना पोलीस शिपाई हिरालाल खोमणे.
०९०१२०२१-बारामती-१३
--------------------------