पुणे : हडपसर येथील किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीसमोर आंदोलन करणाऱ्या चार जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी तर ६३ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. एस. गायकवाड यांनी हा आदेश दिला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नीलेश तोरसकर यांनी फिर्याद दिली आहे. तानाजी बाबूराव कांबळे (वय ३२, माळवाडी, हडपसर), लव सुर्यकांत लाखे (वय ३५, ससाणेनगर, हडपसर), प्रशमेश विलास देवडकर (वय २९, लक्ष्मी कॉलनी, हडपसर) आणि स्मिता सोपान साबळे (वय ५०, गाडीतळ हडपसर) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. सचिन डहाळे, श्रीरंग धायगुडे, संदीप जाधव, सूरज पाटील यांनी पोलिसाविरोधात ताब्यात असताना मारहाण झाल्याची तक्रार केली.
१३१ कामगारांना नोकरीतून कमी केल्याने किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी समोर गेल्या ४१ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शनिवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाºया कामगारांना पोलिसांनी एका महिलेसह ६६ आंदोलकांना अटक केली होती. आंदोलकांनी काळ्या रंगाचे झेंडे दाखवत तेथे दाखल झालेल्या पोलिसांना शिवीगाळ केली. यानंतर फिर्यादीची कॉलर पकडून लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण केली. यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की केली, अशी फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणी खाजगी वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.आंदोलन करणाºया कामगारांना एका महिलेसह ६६ आंदोलकांना अटक केली होती.च्फिर्यादीची कॉलर पकडून लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण केली.च्सरकारी कामात अडथळा आणी खासगी वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.