लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जागेची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या दुकानाचा बेकायदेशीर ताबा मिळवत आतील साहित्य चोरून नेल्याप्रकरणी दोन महिलांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. बारुळकर यांनी २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी दिले.हमीदा इस्माईल आतेफी (वय ४०), हिना इस्माईल आतेफी (वय २२, रा. शिवाजी मार्केट, लष्कर, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. इरफान इस्माईल आतेफी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जावेद इस्माईल खान (वय ३९, रा. लष्कर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १२ मे रोजी दुपारी बुऱ्हानी कॉम्प्लेक्समध्ये घडली.जावेद खान यांनी बुऱ्हानी कॉम्प्लेक्समध्ये गाळा नं. ५ नोटरी कागदपत्रे करून विकत घेतला होता. यामध्ये जागा खरेदी विक्री व्यवसायासाठी त्यांनी टीव्ही, कॉम्प्युटर व टेबल आणून ठेवले होते. १२ मे रोजी आरोपींनी दुकानाचे कुलूप तोडून आतील सर्व साहित्य टेम्पोमध्ये भरले. त्याची माहिती फिर्यादी यांना मिळताच ते दुकानापाशी पोहोचले. या वेळी आरोपींनी ‘ये दुकान मेरा है, मैने उसे लॉक लगाया है, तुझे जो करना है कर’ असे सांगितले.संबंधित दुकानाच्या जागेवरून वाद असल्याने खान यांनी अब्बास शेख व सकीना शेख यांच्यावर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने गुन्ह्याच्या तपासाकरिता आरोपींना हजर राहण्याची नोटीस पाठविली. मात्र, त्यास त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांना अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी दुकानातून चोरून नेलेला सुमारे ६५ हजार रुपये किंमतीचा माल जप्त करायचा असून त्याच्या साथीदारास अटक करायची असल्याने सहायक सरकारी वकील डी. एल. मोरे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.
आरोपी महिलांना पोलीस कोठडी
By admin | Published: May 27, 2017 1:32 AM