पुणे : लॉकडाऊनच्या दरम्यान हातभट्टी दारू, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ यांच्या बेकायदेशीर विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील छुप्या पद्धतीने अनेकजण त्याची विक्री करताना दिसत आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. शिवणे परिसरात तीन कारमधून तंबाखू व सिगारेटची विक्री करणाऱ्या व त्यांना मालाचा पुरवठा करणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.रोहित सिताराम प्रजापती (वय २३, रा.महाल्क्षमी कॉम्पलेक्स, शिवणेगाव), विजय सिताराम प्रजापती (वय २५), पंकज शिवनारायण प्रजापती (वय २२) आणि मुकेश पारसमल छाजेड वय (वय ४०, सर्वजण रा. सहकारनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रजापती हा मालाचा पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे.
लॉकडाऊनच्या काळातही लोकांची तलफ काही सुटता सुटेना, तंबाखू,सिगारेटवरील कारवाई थांबता थांबेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 16:54 IST
शिवणे परिसरात तब्बल १४ लाख ४१ हजार रूपयांचे सिगारेट व तंबाखू जप्त
लॉकडाऊनच्या काळातही लोकांची तलफ काही सुटता सुटेना, तंबाखू,सिगारेटवरील कारवाई थांबता थांबेना
ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट एकची कारवाई तीन सुझुकी कारमध्ये मोठ्या प्रमाणात सिगारेट व तंबाखू विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून