पिंपरी : शहरात भरदिवसा एकाच दिवशी आठ घरफोड्या झाल्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे़ चोरट्यांनी पिंपरी, चिंचवड, वाकडच्या हद्दीत एकाच वेळी ठरावीक वेळेनंतर घरफोडी झाल्यामुळे ही टोळी पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे़ पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच घरफोड्या झाल्या आहे,तर चिंचवड आणि वाकडच्या पोलीस हद्दीत प्रत्येकी एक घरफ ोडी झाली आहे़पिंपरीतील खराळवाडीतील परिसरात चोरट्यांनी पाच घरफ ोड्या केल्या़दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सुमारे ३० तोळ्यांपेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे़ कामानिमित्त बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या घराची पाहणी करून त्याची चोरी करावयाची अशी पद्धत चोरट्यांकडून वापरली जात आहे़ शहरातील अनेक इमारतींतील नागरिक दुपारच्या दरम्यान मुलांना शाळेतून आणण्यासाठी आणि इतर कामासाठी घर बंद करून जातात़ अशा काही इमारती चोरट्यांकडून हेरल्या जाऊन काही तासांच्या आतमध्ये घरफ ोडी केली जाते़ दुपारच्या दरम्यान घरे शोधायची आणि घराजवळ कोणी नसताना चोरी करायची यामुळे नागरिकांत भीती निर्र्माण झाली आहे़ मागील काही दिवसांपूर्वी भोसरी परिसरात बतावणी करून मोटारचालकांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले होते़ त्यानंतर काही दिवसांतच चोरट्यांनी घरफ ोडीचे नवीन शक्कल लढवून चोरी करीत आहे़ चोरट्यांच्या धास्तीमुळे मुलांना शाळेतून घरी आणावयाचे असल्यास घर बंद करण्याशिवाय पर्याय नाही़ त्यामुळे पोलिसांनी दुपारच्या वेळेत गस्त घालून सुरक्षा पुरवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़ दिवसाढवळ्या घरफ ोडी करणाऱ्या चोरट्यांमुळे पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे़ (प्रतिनिधी)
चोरट्याच्या मनी उरली नाही भीती पोलिसांची!
By admin | Published: August 29, 2016 3:18 AM