पुणे : २५ गॅस सिलेंडर आणि तीन चाकी टेम्पो घेऊन पलायन केलेल्या दोघांना हडपसरपोलिसांनी शिताफीने पकडले आहे. याबाबत अनिल खांदवे यांनी तक्रार दिली होती. या गुन्हयात आरोपी गोरख विलास सावंत (वय ३८) आणि सियाराम कशी चौहाण (वय २६) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी असलेल्या खांदवे यांची गॅस एजन्सी आहे. दोघेही आरोपी त्यांच्याकडे कर्मचारी म्हणून कामाला होते. त्यांनी फुरसूंगी येथे असलेल्या गोडावूनच्या पाठीमागे उभा केला तीनचाकी टेम्पो आणि त्यातील भारत पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले पिवळ्या रंगाचे घरगुती वापरातील २५ सिलेंडर ही पळवले. यातील टेम्पोची किंमत दोन लाख तर सिलेंडरची किंमत ८५ हजार आहे. याबाबत तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हडपसर भागातच काही व्यक्ती ब्लॅकने सिलेंडर विकत असल्याचे समजले. तिथे जाऊन अधिक चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा कबूल केला. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यावर त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.