पुणे - गाडी मागे न घेताना पाठीमागे न पाहता निष्काळजीपणे चालवून दोघा वारक-यांना जखमी केल्याप्रकरणी अलंकार पोलिसांनी पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ चंद्रकांत शंकरराव बेंद्रे (रा़ संकल्प सोसायटी, हिंगणे, कर्वेनगर) असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे़ याप्रकरणी सरकारच्या वतीने पोलीस नाईक सौरभ पांडुरंग कटके यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना हिंगणे येथील संकल्प सोसायटीत सोमवारी रात्री साडेदहाला घडली.या प्रकारात कुबेर सौदागर वाघमारे (वय ६८) आणि तुकाराम राजू पवार (वय ७४, दोघे रा़ सोलापूर) हे दोन वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत बेंद्रे हे सातारा येथे पोलीस निरीक्षक असून त्यांचा संकल्प सोसायटीत फ्लॅट आहे़ संकल्प सोसायटीत अक्कलकोटवरून निघालेली स्वामी समर्थाची पालखी मुक्कामाला आली होती़ त्यातील काही वारकरी पार्किंगमध्ये झोपले होते़ चंद्रकांत बेंद्रे हे आपली कार घेऊन रात्री सोसायटीत आले़ त्यांनी पार्किंगसाठी गाडी मागे घेत असताना तेथे झोपलेल्या दोघा वारकºयांच्या पायावरून गाडीचे चाक गेले़ इतर वारकºयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले़ या जखमींचा उपचाराचा खर्च बेंद्रे यांनी केला़ त्यामुळे वारकºयांनी आमची काही तक्रार नाही़ तसेच दिंडीप्रमुखांनीही आमची काहीही तक्रार नसल्याचे सांगितले़ चंद्रकांत बेंद्रे यांनी गाडी मागे घेताना कोणी पाठीमागे असेल, याची कल्पना नसल्याने हा प्रकार घडलेला आहे, असे पोलिसांना सांगितले़ या प्रकरणी कोणीही तक्रार देत नसल्याने परंतु, कायद्यानुसार गुन्हा होत असल्याने सरकारतर्फे तक्रार देत असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़ या प्रकरणात काही व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यात नागरिकांनी बेंद्रे यांच्याशी वादावादी केल्याचे दिसून येत आहे़ चंद्रकांत बेंद्रे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही़चंद्रकांत बेंद्रे सातारा येथील पोलीस निरीक्षकसरकारतर्फे करण्यात आला गुन्हा दाखलया प्रकरणाचा व्हिडीओझाला व्हायरल
पोलीस अधिका-यावर अखेर गुन्हा दाखल, वारक-यांच्या अंगावर घातली गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 3:56 AM