मंचर पोलीस स्टेशनमध्ये पाच वाफ घेण्याची यंत्रे, १०० मास्क आणि फूड पॅकेट बॉक्स पोलिसांना देण्यात आला. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्याकडे तो सुपूर्त करण्यात आला. पोलीस अनेक वेळा कोरोना संवेदनशील क्षेत्रात कार्यरत असतात. त्यामुळे त्यांना कोविड १९ चा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यांनी ड्युटीप्रसंगीच दिवसातून एक दोन वेळा कार्यालयातच वाफ घेतल्यास संसर्ग रोखला जाऊ शकतो . त्यांच्याकडे वाफ घेण्याचे छोटेसे यंत्र जवळ असल्यास त्यांना सोयीस्कर पडेल, असे वायाळ यांनी सांगितले. त्यांच्यातर्फ़े मास्क आणि वाफ घेण्याचे मशीन तर कॉन्सट्रीक्स कंपनीतर्फे ५० फूड पॅकेट्स देण्यात आले. पोलीस निरीक्षक कोरे यांना ही संकल्पना आवडली.
रवींद्र वायाळ यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन, राजगुरूनगर पोलीस स्टेशन आणि पाबळ आउट पोस्ट येथेसुद्धा अशाच प्रकारचा सेट दिला आहे. स्थानिकांनी त्यांच्या परिसरातील स्थानिक प्रशासनाला अशी मदत करणे अपेक्षित आहे असे सांगितले.