येरवडा : येथील ईशान्य मॉलमध्ये रविवारी रात्री (दि.7) सुरू असलेल्या पार्टीबाबत तक्रारी आल्याने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आयोजकांनी नियमांचा भंग केल्याचे लक्षात आल्याने ही पार्टी बंद करून आयोजकावर गुन्हा दाखल केला. या पार्टीमध्ये परदेशी कलाकारही सहभागी होणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करून रात्री साडेआठच्या सुमारास पार्टी बंद केली.
या प्रकरणी पार्टीचा आयोजक अहजर इक्बाल शेख (रा. स. नं. 74, लेन क्र.16, सय्यदनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्टीच्या आयोजनासाठी पोलीस आयुक्त (परिमंडळ 4), मद्यसाठा करण्यासाठी उत्पादनशुल्क विभाग व सनबर्न इवेंट या कंपनीच्या परदेशी कलाकारांच्या सहभागासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, पोलीस आयुक्तांनी दिलेल्या परवानगीमध्ये 3क्क् लोकांची मर्यादा घालण्यात आली होती. प्रत्यक्षात पार्टीमध्ये 1 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. तसेच या पार्टीमध्ये ध्वनिमर्यादेचाही भंग होत होता. याबाबत शिवसेना, मनसेचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्याने घटनास्थळी जाऊन खातरजमा करून पार्टी बंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. साळुंके करीत आहेत.
(वार्ताहर)
एक हजारांहून अधिक लोकांचा सहभाग
4येरवडय़ातील मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये परवानगी घेतलेल्या संख्येपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या परवानगीमध्ये 3क्क् लोकांची मर्यादा घालण्यात आली होती. प्रत्यक्षात पार्टीमध्ये 1 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. तसेच, या पार्टीतील ध्वनिमर्यादेचाही भंग झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. या पार्टीबाबत स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या ठिकाणी पाहणी केली असता, हा प्रकार उघड झाला.