राजगुरुनगर - साचलेला कचरा, पाण्याचे दुर्भिक्ष, अपुरी वीज, आरोग्याची अपुरी साधने आणि ढिसाळ व्यवस्थापन यामुळे राजगुरुनगर येथील पोलीस ठाण्याच्या लॉकअपची दुरवस्था झाली आहे. खोल्यांची संख्या अपुरी असून आरोपींची संख्या वाढली आहे. त्यामुळे एका खोलीत १० ते १२ आरोपी कोंबले जात आहेत. अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक आरोपी आजारी पडल्यामुळे त्यांना उपचार पुरवावे लागत आहेत.राजगुरुनगर शहरामध्ये खेड न्यायालयाची ब्रिटीश कालीन इमारत आहे. या इमारतीमध्ये तलसीलदार कार्यालय, पोलीस लॉकअप रुम आहे. पोलीस लॉक अपच्या 1० बाय १५च्या पाच खोल्या आहेत. या खोल्यांपैकी १ एका खोलीमध्ये तहसिल कचेरीचे महत्वाचे दस्तावेज ठेवण्यात आले आहे. त्या शेजार असलेली खोली पोलीस गार्ड यांच्या वापराकरिता ठेवलेली आहे. यातील एक खोली महिला आरोपींंसाठी असून उर्वरीत दोन खोल्यांमध्ये पुरुष आरोपींसाठी आहे.त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. या स्वच्छतागृहांसाठी पुरेसे पाणी पुरविले जात नाही. डासांचाही प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे आरोपींच्या आजारी पडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशा आरोपीना चांडोली येथील शासकीय रुग्णालयात नेऊन उपचार केले जातात.येथील डॉक्टर जुजबी उपचार करुन रुग्णांना पुण्याला घेऊन जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आजारी आरोपींची ने-आण करण्यासाठी पोलिसांना मनुष्यबळाची तजवीज करावी लागते. मुळातच याभागातील पोलीस ठाण्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे याच भागात पोलिसांनी नविन इमारतीचे बांधकाम करावे अशी मागणी केली जात आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाच बाहेरून पाणी आणून आरोपींना दयावे लागते.दुर्गंधीचा त्रासखेड तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोपींच्या संख्येचा आकडा वाढू लागला आहे. चाकण, आळंदी व खेड पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील आरोपींना अटक केल्यानंतर या लॉकअपमध्ये ठेवण्यात येते. आरोपींच्या वाढलेल्या संख्येमुळे एका एका खोलीमध्ये १० ते ११ आरोपींना ठेवण्यात येत आहे. खोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश नाही. खोल्यांमध्येच स्वच्छतागृहे असल्याने दुर्गंधी पसरलेली आहे.
पोलिसांच्या लॉकअपची दुरवस्था, पिण्यासाठी पाणी नाही, अपु-या खोल्यांमुळे आरोपींची एकत्रच कोंबाकोंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 2:52 AM