अविनाश फुंदे पुणे : शहरात दुकाने-हॉटेल, खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री अकरा नंतर सुरु ठेवण्याची परवानगी नसतानाही अनेक ठिकाणी त्या बेकायदेशीररित्या चालू असल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या अशिवार्दाने हे प्रकार चालू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांच्याच उपस्थितीत राजरोसपणे रात्रीचे हे उद्योग चालू असल्याचे ‘लोकमत ’च्या पाहणीत आढळून आले. डेक्कन कॉर्नर, मॉडेल कॉलनी, चतु:शृंगी, पुणे रेल्वे स्टेशन यासह शहराच्या अनेक भागात खाद्यपदार्थाच्या गाड्या,पान टपºया, हॉटेल्स या नियम धाब्यावर बसवून पहाटे ४ पर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. मध्यरात्री चालणाऱ्या हॉटेल्स आणि खाद्य पदार्थ गाड्यांचे तरुणाईत विशेष आकर्षण असलेले दिसून येते. या ठिकाणी पोलीस येतात. व्यवसाय मालक त्यांना 'हवे' ते देतात आणि कारवाई न करताच निघून जातात. रात्रीच्या वेळेस त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थे बरोबरच आर्थिक हितसंबंध जपले जात असल्याने पोलिस यंत्रणा याकडे काणाडोळा करत आहेत का, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थीत करत आहेत. नाव न छापण्याच्या अटीवर एका दुकानदाराने सांगितले, की आम्ही रात्री साडेअकरा पर्यंत जरी दुकान सुरु ठेवले तरी पोलीस येऊन दमदाटी करतात. माझ्या शेजारीच शंभर मीटरवर असलेली हातगाडी पहाटे चार वाजेपर्यंत सुरु असते त्यावर मात्र पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. विश्रांतवाडी, चतु:शृंगी, डेक्कन बस स्थानक, झेड ब्रिजच्या खाली, फर्ग्युसन रस्ता, डेक्कन कॉर्नर, नळ स्टॉप चौक, कर्वे रस्ता, शिवाजी पुतळा कोथरूड या ठिकाणी रात्री दोन वाजताही ठराविक दुकाने सुरु असल्याचे ह्यलोकमतह्णच्या पाहणीत दिसून आले. रात्री गस्तीवर असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या परिसरातल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर ये-जा चालू असल्याचेही निदर्शनास आले आहे. यापूर्वी अनेकवेळा रेस्टॉरंट, बार आणि अन्य व्यावसायिकांनी रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली होती. पोलिसांची अपुरी संख्या व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन गृह विभागाने त्याची परवानगी नाकारली. रात्रीच्या व्यवसायांमुळे पोलिसांवर ताण येऊ शकतो. गुन्हेगारी वाढू शकते. परंतु याकडे पोलीस प्रशासनाची डोळेझाक होताना दिसते.................मुंबई गुमास्ता कायदा शहरातील प्रत्येक व्यवसाय, कंपन्यांचा कारभार, दुकाने आणि आस्थापने गुमास्ता कायद्यानुसार चालतात. या कायद्यात प्रत्येक व्यावसायाची वेळ ठरवुन देण्यात आली आहे. या कायद्यात विविध व्यवसायांची पाच श्रेणींमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. दुकाने, वाणिज्य संस्था, निवासाची व्यवस्था असलेली हॉटेल्स, केवळ खाण्याची व्यवस्था असलेली रेस्टॉरंट, चित्रपटगृह अशी ही वर्गवारी आहे. रेस्टॉरंट साडेबारापर्यंत सुरू ठेवता येतात. परंतु पोलीस परवान्यानुसार हे रेस्टॉरंट रात्री दीडपर्यंत खुले ठेवता येते.----------------------------------------------------------........या उशिरा चालणाऱ्या हॉटेल्स आणि इतर व्यवसायांवर आपण सातत्याने कारवाई करतच आहोत. परंतु जर पोलीस कर्मचारी जर जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर याची दाखल घेऊन जर तस कुणी आढळले तर त्यावर कारवाई करण्यात येईल. बाजीराव मोहिते, सहाय्यक पोलीस अयुक्त कोथरूड विभाग ----------------------------------------------------------मी चतु:शृंगी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांच्याशी या संदर्भात बोलतो रात्री ११: पर्यंत दुकाने बंद होणे अपेक्षित असते आणि जर कुणी चालू ठेवलं असेल आपण ते बंद करतो. आणि जर कर्मचारीच त्या ठिकाणी थांबत असतील याचे पुरावे मिळाले तर त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल देविदास पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग ----------------------------------------------------------