पुणे (बारामती) : बारामती येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. खुद्द उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या चालकावर अशा प्रकारची कारवाई प्रथमच झाली आहे. त्यामुळे शहरात दिवसभर हा विषय चर्चेचा झाला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या वाहनावर लक्ष्मण दादु झगडे हा चालक आहे. झगडे यास आज मंगळवारी(दि २१) १२ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात रंगेहात पकडले. पुढील कारवाईसाठी झगडे यास बारामती शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते,सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय भापकर, प्रतिभा शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.