पोलीस अधिकाऱ्यांनी पथारी व्यावसायिकांवर बेकायदेशीर कारवाई करू नये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 12:47 PM2020-02-08T12:47:33+5:302020-02-08T13:02:36+5:30

गेल्या महिन्यापासून पथारी व्यावसायिकांची एका बाजूने उपासमार चालू आहे

Police officers should not take unlawful action | पोलीस अधिकाऱ्यांनी पथारी व्यावसायिकांवर बेकायदेशीर कारवाई करू नये

पोलीस अधिकाऱ्यांनी पथारी व्यावसायिकांवर बेकायदेशीर कारवाई करू नये

Next
ठळक मुद्देयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनकेंद्र सरकारच्या २०१४ फेरीवाला कायद्याअंतर्गत परवानेपोलीस आणि महानगरपालिकेला सहकार्य करण्यास तयार

पुणे: पुणे पोलीस आणि महानगरपालिका यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याची योजना आखली आहे. वाहतूक जलद होण्यासाठी परवानाधारक पथारी व्यावसायिकांना पोलीस अधिकारी व्यवसाय बंद करण्यास भाग पाडत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कारवाई करू नये. शिवराय विचार पथारी संघटना अध्यक्ष रविंद्र माळवदकर यांनी अशी विनंती पत्रकार परिषदेत केली.
यावेळी संघटनेचे जितेंद्र पायगुडे, ज्ञानेश्वर पडवळ, संजय निपाने, निलेश हबीब आदी उपस्थित होते. 
माळवदकर म्हणाले, गेल्या महिन्यापासून पथारी व्यावसायिकांची एका बाजूने उपासमार चालू आहे. तर दुसरीकडे पोलीस व्यवसाय बंद करण्यास भाग पाडत आहेत. आम्ही वाहतूक सुरळीत करण्याच्या योजनेचे आम्ही स्वागत करतो. वाहतूक जलद होण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. त्याप्रमाणे आमच्या जगण्याचा प्रश्नही महत्वाचा आहे. आम्हाला केंद्र सरकारच्या २०१४ फेरीवाला कायद्याअंतर्गत परवाने मिळाले आहेत. आम्ही पोलीस आणि महानगरपालिकेला सहकार्य करण्यास तयार आहोत. या सर्व बाजूचा विचार करून आम्हाला नियमात व्यवसाय करून दयावा. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Police officers should not take unlawful action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.