कोरेगाव भीमा : वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथील वाद व त्यानंतर १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी कर्तव्याची जबाबदारी पार पाडत चोख बंदोबस्त ठेवत परिसरात शांतता प्रस्थापित केली. सलग ३ वर्ष पोलीसांनी ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता कोरेगाव भीमा परिसर शांत करण्याचे काम ''''सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'''' या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे चोख पार पाडली आहे.
कोरेगाव भीमा व परिसरात १ व २ जानेवारी रोजी उसळलेल्या दंगलीमध्ये जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना तैनात राहावे तर लागलेच शिवाय जमावाचे दगडही खावे लागले होते. या दंगलीत लोकांच्या रक्षणासाठी असलेले अनेक पोलीस जखमी झाले होते. तर, सणसवाडी येथे दंगलीत जमावाने राहुल फटांगडे या तरूणाचा खून केला होता. १
जानेवारी रोजी सकाळी ११ ते साडेअकराच्या दरम्यान सुरू झालेली दंगल सायंकाळी पाचव्या सुमारास आटोक्यात आली होती. मात्र, कोरेगाव भीमा, सणसवाडी , वढु बुद्रुक, पेरणे, शिक्रापुर, चौफुला या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असल्याने जमावबंदीचे आदेश लागू केले होते. यादरम्यान ३० डिसेंबर २०१८ रोजी सुरू झालेला पुणे ग्रामीण पोलीसांचा बदोबस्त २९ डिसेंर २०२० डिसेंबरनंतरही कायमच राहिला असल्याने अद्यापही या परिसराला छावणीचे स्वरूप कायम आहे. या वर्षी १ जानेवारीला विजयस्तंभास मानवंदना कार्यक्रम प्रतिकात्मक असला तरी पोलीस प्रशासनाने आपल्या तयारित कोणतीच कसर ठेवली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पोलीस बंदोबस्तांमध्ये ५० टक्याने कपात करण्यात आली आहे.
फोटो : कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथे बंदोबस्तात असलेले पोलीस कर्मचारी