शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

ग्रामसभेत  ‘पोलीस पाटील’ हटाव मोहीम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 21:22 IST

ग्रामस्थांनी आम्हाला सध्याचे पोलीस पाटील नको आहेत. यासाठी मतदान घेण्याची मागणीही केली. ही मागणी मान्य करून ‘गुप्त’ पध्दतीने मतदान घेण्यात आले.

ठळक मुद्देग्रामस्थांच्या रोषाचे कारण शोधण्याची आवश्यकता

पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ग्रामसभा मंगळवारी पार पडली. मात्र, ही ग्रामसभा वादळी ठरली. गावचे पोलीस पाटील बदलण्याचा ठराव करावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यातच ग्रामविकास अधिकारी यांनी तसा ठराव ग्रामसभेत करता येत नाही असे सांगितल्याने ग्रामस्थांचा पारा चढला.पोलीस पाटील बदलाचा ठराव करता येत नसल्याचे लेखी द्या, कोण म्हणते ठराव करता येत नाही, आम्ही पुरावे सादर करतो असे म्हणत ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी दिपक भोसले यांना धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. यावेळी ग्रामस्थांनी आम्हाला सध्याचे पोलीस पाटील नको आहेत. यासाठी मतदान घेण्याची मागणीही केली. ही मागणी मान्य करून ‘गुप्त’ पध्दतीने मतदान घेण्यात आले. ग्रामसभेला ११९ ग्रामस्थ उपस्थित होते. त्यापैकी ८२  ग्रामस्थांनी मतदान केले. पोलीस पाटलांच्या विरोधात ८० तर त्यांच्या बाजुने २ मते पडली. त्यामुळे या ग्रामसभेत जणू काही पोलीस पाटील ‘हटाव’ ची मोहिमच राबविण्यात आली.      ग्रामसभेत सुरवातीला ‘प्रोसडींग’ वाचन झाले. त्यानंतर इतर विषय ही सवार्नुमते मंजूर करण्यात आले. मात्र, ऐनवेळीच्या विषयात चर्चा झाली तेव्हा आलेल्या अर्जाचे वाचन करण्यात आले. त्याअंतर्गत योगेश कदम, हनुमंत भंडलकर, काकासाहेब कनेहरकर यांनी पोलीस पाटील बदलण्याची मागणीचा अर्ज ग्रामविकास अधिकारी यांना दिला होता. त्यानुसार गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी दोन वाजता ग्रामविकास अधिकारी भोसले यांनी मतमोजणी केली. भिगवण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. या  ग्रामसभेला सरपंच राणी कनेहरकर, उपसरपंच विजय राक्षे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते................पोलीस पाटील हटवा यासाठी मतदान होण्याची बहुधा पुणे जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. पोलीस पाटील हा गावामध्ये एकोपा राहावा, गावात भांडणे होऊ नये, यासाठी काम करत असतात. ४येथील पोलीस पाटील यांच्या विरोधात गाव एकवटून मतदान घेतो ही खेदाची बाब आहे. मात्र, ग्रामस्थांच्या रोषाचे कारण शोधण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :PuneपुणेBhigwanभिगवणIndapurइंदापूर